मुंबई : कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाचा दारुण पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने भारताला 209 धावांनी पराभूत करत जेतेपदावर नाव कोरलं. भारताची कामगिरी पाहून क्रीडाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र या पराभवाच्या धक्क्यातून सावरत कर्णधार रोहित शर्मा आता कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. रोहित शर्मा पत्नी रितिका सजदेह आणि मुलगी समायरासोबत सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. या दरम्यान रितिकाने इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत रोहित शर्मा वेगवेगळे हावभाव देताना दिसत आहे. या व्हिडीओमागचं कारणही रितिकानं आपल्या इंस्टाग्राम स्टोरीत सांगितलं आहे.
रितिका सजदेह हीने हा व्हिडीओ शेअर सांगितलं आहे की, “माझा फोन समुद्रात पडला होता. तो काढण्यासाठी रोहित शर्माने पाणीत उडी मारली.” हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. आयपीएल 2023 आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपन फायनलनंतर भारतीय क्रिकेटपटूंना ब्रेक मिळाला आहे. भारत आता 12 जुलै रोजी वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे.
……….. pic.twitter.com/I30jZN7EwX
— Riya Kasana (@RIYAkasana1) June 16, 2023
मीडिया रिपोर्टनुसार, वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर रोहित शर्माचं कर्णधारपद जाण्याची शक्यता आहे. भारत या दौऱ्यात दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात मालिका गमावल्यानंतर विराट कोहलीने कर्णधारपद सोडलं होतं. त्यानंतर कर्णधारपदाची माळ रोहितच्या गळ्यात पडली होती.
सध्या तरी वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत रोहित शर्माचं कर्णधारपद सुरक्षित आहे. पण या मालिकेनंतर त्याच्याकडे कर्णधारपद राहिल की नाही याबाबत शंका आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत भारत 2 कसोटी सामने खेळणार आहे. मात्र या दोन्ही सामन्यांमध्ये रोहित शर्मा फलंदाजीत अपयशी ठरल्यास कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून हटवले जाण्याची शक्यता आहे.
आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 लक्षात घेऊन आता नवीन कर्णधाराची निवड करणं गरजेचं आहे. 36 वर्षीय रोहित शर्मा पुढील वर्षी टीम इंडियात असेल की नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळे कसोटी कर्णधारपदाची जबाबदारी रोहित शर्माच्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील कामगिरीवर असेल.
कसोटी मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना – 12 ते 16 जुलै, डोमिनिका.
दुसरा सामना – 20 ते 24 जुलै, पोर्ट ऑफ स्पेन.
वनडे सीरिजचं वेळापत्रक
पहिला सामना, 27 जुलै, बारबाडोस.
दूसरा सामना, 29 जुलै, बारबाडोस.
तिसरा सामना – 1 ऑगस्ट, त्रिनिदाद.
टी 20 सीरिज
पहिला सामना – 4 ऑगस्ट
दुसरा सामना – 6 ऑगस्ट
तिसरा सामना – 8 ऑगस्ट
चौथ्या सामना – 12 ऑगस्ट
पाचवा सामना – 13 ऑगस्ट.