Rohit Sharma video : रोहित शर्मा याला ‘वडापाव’ म्हणून चिडवणाऱ्यांनो त्याचा डान्स करतानाचा व्हिडीओ एकदा पाहाच

| Updated on: Mar 17, 2023 | 5:25 PM

रोहित शर्मा त्याच्या पत्नीच्या भावाच्या लग्नासाठी गेला आहे. या लग्नाच्या फंक्शनमध्ये कर्णधार रोहित शर्माचा डान्स करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. कर्णधारदाची धुरा हार्दिक पांड्याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.

Rohit Sharma video : रोहित शर्मा याला वडापाव म्हणून चिडवणाऱ्यांनो त्याचा डान्स करतानाचा व्हिडीओ एकदा पाहाच
Follow us on

मुंबई : भारताचा कर्णधार रोहित शर्माचा मेहुणा कुणाल सजदेह विवाहबंधनात अडकणार आहे. रितिका सजदेहचा भाऊ मेकअप आर्टिस्ट अनिशा शाहसोबत लग्न करणार आहे. या लग्नासाठी रोहित शर्मा पहिल्या वनडेसाठी उपस्थित नसणार आहे. रोहितच्या अनुपस्थितीत भारतीय संघाच्या कर्णधारदाची धुरा हार्दिक पांड्याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. या सामन्यामध्ये रोहित शर्मा त्याच्या पत्नीच्या भावाच्या लग्नासाठी गेला आहे. या लग्नाच्या फंक्शनमध्ये कर्णधार रोहित शर्माचा डान्स करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

या लग्नाच्या फंक्शनमध्ये कर्णधार रोहित शर्मा त्याची पत्नी रितिका सजदेहसोबत डान्स करत आहे. रोहितला डान्स करताना क्वचितच पाहिलं असेल, एखाद्या जाहिरातीमध्ये रोहितला डान्स करताना पाहिलं असेल. फंक्शनमधील रोहितचा डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

 

अलीकडेच रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने  बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर कब्जा केला. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली आणि यासह टीम इंडियाने ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठली आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेतील पहिला सामना 17 मार्च रोजी मुंबईत खेळवला जाणार आहे. यानंतर दुसरा वनडे सामना 19 मार्चला विशाखापट्टणममध्ये तर मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना 22 मार्चला चेन्नईत खेळवला जाणार आहे.

ऑस्ट्रेलियाला 50 ओव्हरच्या सामन्यात 36 ओव्हरही खेळता आलं नाही. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांपुढे शरणागती पत्कारली. ऑस्ट्रेलियाने शेवटच्या 4 विकेट्स या 4 धावांमध्येच गमावल्या. ऑस्ट्रेलियाने ऑलआऊट 188 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी 189 धावांचं आव्हान मिळालं आहे.

वनडे मालिकेसाठी भारतीय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार – शेवटचे 2 वनडे), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल आणि जयदेव उनाडकट.