मुंबई : भारताचा स्टार खेळाडू रिषभ पंतचा गेल्या 31 डिसेंबरला झालेला अपघात कोणीही विसरणार नाही. वेळ आली होती पण काळ नाही, कारण हा अपघाताच इतका भयंकर होता की त्यामध्ये पंतची कार जळून खाक झाली होती. आता त्याच जागेवर एक अपघात झाला असून त्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा अपघातही इतका भयंकर होता की त्यामधील कार पलटी झालेली दिसत आहे.
बुधवारी रुरकीच्या नरसनजवळ एक कार भरधाव वेगाने चालली होती. कारचा वेग इतका होता की समोर आलेल्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या नादात तो चकवा देत तो कारचालक पुढे जातो. त्यानंतर तीच गाडी पुढे जावून महामार्गाचा दुभाजक तोडून उलटली. या अपघातात एक तरुण आणि युवती किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून क्रेनच्या साहाय्याने महामार्ग मोकळा केला. गाडीचा वेग एवढा होता की तरूणाला नियंत्रण ठेवता आलं नाही.
ऋषभ पंत याच्या अपघातानंतर पुन्हा तसंच काहीसं घडलं, ‘त्या’ स्पॉटवर नेमकं असं का होतंय? पाहा Video#viral #accident #rishabhpant #cricket #म pic.twitter.com/HyR9DIXe1w
— Harish Malusare (@harish_malusare) March 17, 2023
पोलिसांनी जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले. जखमी प्रवासी नोएडाचे रहिवासी असून ते हरिद्वारहून परतत होते. या अपघातात साहिल, सावन, प्राची गौतम आणि श्रुती जखमी झाले आहेत. जखमींच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली.
ऋषभ पंतचा याच जागेवर अपघात झाला होता, त्याच्या कारला आग लागली आणि पूर्ण जळून गेली. नशीब बलवत्तर म्हणून पंतला त्यावेळी स्थानिकाने मदत केली आणि रूग्णालयात पाठवलं होतं. या अपघाताने संपूर्ण देश हादरून गेला होता. पंत भारतीय संघाचा भविष्यातील महत्त्वाचा खेळाडू मानला जातो.
दरम्यान, या अपघतामधून पंत जबर जखमी झाला होता त्यातून कव्हर होण्यासाठी त्याला वेळ लागत आहे. या दुखापतीमुळे पंत आताच झालेली बॉर्डर गावसकर ट्रॉफी खेळू शकला नव्हता. त्यासोबतच आताची आयपीएलही तो खेळू शकणार नाही.