मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग 2024 मधील दुसऱ्या पर्वामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विजेतेपदावर नाव कोरलं. आरसीबी संघाने फायनल सामन्यामध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा पराभव करत हा विजय नोंदवला. आरसीबी फ्रंचायसीने या ट्रॉफीसाठी सतरा वर्ष वाट पाहिली. मेन्स टीमला अजून ही कामगिरी करता आली नाही. एकदा दोनदा नाहीतर तीनवेळा फायनल गाठणाऱ्या आरसीबी संघाला एकदा ट्रॉफी जिंकता आलेली नाही. मात्र वुमन्स टीमने दुसऱ्याच सीझनमध्ये ट्रॉफीवर नाव कोरलं. आरसीबी वुमन्स संघासाठी पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीमध्ये एलिस पेरीने सर्वात जास्त लक्ष वेधलं. साडीमधील डान्स सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या पार्टीमध्ये आरसीबी टीमच्या सर्व खेळाडू वेगवेगळ्या लूकमध्या पाहायला मिळाल्या. एलिसा पेरीने नेसलेल्या काळ्या रंगाच्या साडीमध्ये तिचं सौंदर्य आणखी खुललं होतं. पेरीने साडीवरच डान्स केला, तिच्या डान्यचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
The Perry Perry music in india😅
The queen of RCB🏆#EllysePerry #WPL2024
pic.twitter.com/ap7OoafzwE— Aussies Army🏏🦘 (@AussiesArmy) March 18, 2024
एलिसा पेरीची भारतामध्ये चर्चा होत आहे. एलिसा पेरीने आरसीबीला ट्रॉफी मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. यंदाच्या सीझनमध्ये पेरीने सर्वाधिक 347 धावा काढत ऑरेंज कॅप जिंकली. त्यासोबतच पेरीने बॉलिंगमध्येही आपली छाप सोडली. मुंबईविरूद्धच्या सामन्यात एकटी पेरी भारी पडली, संघ अडचणीत असताना केलेली अर्धशतकी खेळी आणि त्यानंतर बॉलिंगमध्ये एकटीने मुंबईच्या संघाला खिंडार पाडलं होतं.
दरम्यान, एलिस पेरी भारतात येण्याआधीपासूनच तिची चर्चा होती. अखेर पेरीने शेवटच्या सत्रात भारतातही आपली छाप पाडली. प्रत्येक भारतीय चाहत्याच्या मनात पेरीने आपलं वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे. विजेतेपद जिंकल्यावर आता पेरीच्या साडीची चर्चा होत असलेली पाहायला मिळत आहे.