RR vs CSK IPL 2023 Score : सीएसकेचा विजयरथ संजूने रोखला, 32 धावांनी मिळवला विजय

| Updated on: Apr 28, 2023 | 12:26 AM

Chennai Super Kings vs Rajasthan Royals IPL 2023 Score in Marathi : जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून दोघांमधील हा सामना रंगणार आहे. चेन्नईने या मोसमात आतापर्यंत 5 आणि राजस्थानने 4 सामने जिंकले आहेत.

RR vs CSK IPL 2023 Score : सीएसकेचा विजयरथ संजूने रोखला, 32 धावांनी मिळवला विजय
Follow us on

मुंबई : आयपीएल-2023 मध्ये राजस्थान रॉयल्सने चेन्नईचा दुसऱ्यांदा पराभव केला आहे. यावेळी त्यांच्या घरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळताना राजस्थानने चेन्नईचा 32 धावांनी पराभव केला. यापूर्वी हे दोन्ही संघ चेपॉकमध्ये भिडले होते आणि त्या सामन्यातही चेन्नईचा पराभव झाला होता. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने पाच गडी गमावून 202 धावा केल्या. चेन्नईला सहा गडी गमावत 170 धावाच करता आल्या. राजस्थानकडून यशस्वी जयस्वालने सर्वाधिक 77 धावा केल्या. चेन्नईकडून शिवम दुबे याने सर्वाधिक 52 धावा केल्या.

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेवन): यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सैमसन (w/c), शिमरोन हेटमेयर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, एडम ज़म्पा, संदीप शर्मा, युजवेंद्र चहल

चेन्नई सुपर किंग्स (प्लेइंग इलेवन): ऋुतुराज गायकवाड, डेवॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोइन अली, अंबाती रायडू, शिवम दूबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कप्तान), मथीशा पथिराना, तुषार देशपांडे, महेश तीक्ष्णा

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 28 Apr 2023 12:24 AM (IST)

    राजस्थानने 32 धावांनी सामना जिंकला

    राजस्थानने हा सामना 32 धावांनी जिंकला. राजस्थानचा या मोसमातील चेन्नईवरचा हा दुसरा विजय आहे. चेन्नईकडून सर्वाधिक 52 धावा करणारा शिवम दुबे शेवटच्या चेंडूवर बाद झाला.चेन्नईला विजयासाठी 203 धावा करायच्या होत्या, मात्र या संघाला सहा विकेट्स गमावून केवळ 170 धावाच करता आल्या.

  • 27 Apr 2023 11:08 PM (IST)

    RR vs CSK Live : दुबेचं अर्धशतक

    शिवम दुबे याने 29 चेंडूत 50 धावा करत आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. यामध्ये त्याने 4 सिक्सर आणि 2 चौकार मारले आहेत.


  • 27 Apr 2023 10:58 PM (IST)

    RR vs CSK Live : मोईन अली आऊट

    मोईन अली 15व्या षटकात बाद झाला. 12 चेंडूत 23 धावा केल्या. मोईन अलीला जम्पाने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. आता चेन्नईला हा सामना जिंकून चमत्काराची आशा आहे. शिवम दुबे मात्र 18 चेंडूत 30 धावांवर खेळत आहे.

  • 27 Apr 2023 10:39 PM (IST)

    RR vs CSK Live : गेमचेंजर अश्विन

    अश्विनने 11व्या षटकात चेन्नईला दुसरा धक्का दिला. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर रहाणेला बाद केल्यानंतर त्याने चौथ्या चेंडूवर अंबाती रायुडूला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. अंबातीने येताच स्वीप खेळला आणि डीप मिडविकेटवर जेसन होल्डरकरवी झेलबाद झाला. अंबातीला खातेही उघडता आलं नाही.

  • 27 Apr 2023 10:06 PM (IST)

    RR vs CSK Live : कॉनवे आऊट

    चेन्नईचा पॉवरप्ले चांगला चालला होता, पण सहाव्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर डेव्हॉन कॉनवे बाद झाला. अॅडम झम्पाचा चेंडू मिडऑफवर टाकण्याचा प्रयत्न केला पण तिथेच उभ्या असलेल्या संदीप शर्माने त्याचा झेल घेतला. चेन्नईने या सहा षटकांत एक गडी गमावून 42 धावा केल्या आहेत.

  • 27 Apr 2023 09:41 PM (IST)

    RR vs CSK Live :

    चेन्नईचा डाव सुरू झाला आहे. चेन्नईकडून डेव्हॉन कॉनवे आणि ऋतुराज गायकवाड डावाची सुरुवात करत आहेत.

  • 27 Apr 2023 09:32 PM (IST)

    RR vs CSK Live :

    संजू सॅमसन याने टॉस जिंकत प्रथम बॅटींगचा निर्णय घेतला होता. पहिल्यांदा बॅटींग करताना राजस्थान संघाने 202 धावा केल्या आहेत. राजस्थानकडून सलामीवीर यशस्वी जयस्वाल याने सर्वाधिक 77 धावांची खेळी केली आहे. शेवटला ध्रुव जुरेल याने 15 चेंडूत 34 धावा केल्या आहेत. सीएसकेकडून तुषार देशपांडे 2, रविंद्र जडेजा 1 आणि महेश तीक्ष्णा यांनी 1 विकेट घेतल्या.

  • 27 Apr 2023 08:46 PM (IST)

    RR vs CSK Live : एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट्स

    राजस्थान रॉयल्सला 132 धावांवर तिसरा मोठा धक्का यशस्वी जयस्वालच्या रूपाने बसला. 43 चेंडूत त्याने 77 धावांची खेळी होती. तुषार देशपांडे याने एकाच ओव्हरमध्ये संजू आणि जयस्वालला माघारी पाठवलं.

  • 27 Apr 2023 08:14 PM (IST)

    RR vs CSK Live : जडेजाने मिळवून दिलं पहिलं यश

    राजस्थान रॉयल्सला पहिला झटका 9व्या ओव्हरमध्ये बसला आहे. जोस बटलर 21 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 27 धावा करून बाद झाला. जडेजाच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादात तो आऊट झाला. दुसरीकडे जयस्वाल 29 चेंडूत 53 धावांवर खेळत आहे.

  • 27 Apr 2023 08:04 PM (IST)

    RR vs CSK Live : जयस्वालचं अर्धशतक

    सात ओव्हरमध्ये 75 धावा राजस्थान संघाने केल्या आहेत. यशस्वी जयस्वाल याने 26 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. यामध्ये 6 चौकार आणि 3 षटकार मारले आहेत. बटलर नाबाद 27 धावांवर खेळत आहे.

  • 27 Apr 2023 07:41 PM (IST)

    RR vs CSK Live

    राजस्थान संघाकडून मैदानात जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल आले असून दमदार सुरूवात केली आहे. दोन ओव्हरमध्ये राजस्थानने बिनबाद 24 धावा केल्या आहेत. तर पहिल्या ओव्हरमध्ये यशस्वीने 3 चौकार मारत संघाचं खातं उघडलं होतं.

  • 27 Apr 2023 07:12 PM (IST)

    RR vs CSK Live : बटलरकडून अपेक्षा

    धोनीने टॉस हरला असला तर सीएसकेला पहिल्यांदा गोलंदाजी करायची होती. राजस्थानकडून आज जोस बटलरकडून अपेक्षा असणार आहेत. 2018 मध्ये बटलरने सीएसकेविरूद्ध नाबाद 95 धावा केल्या होत्या.

    राजस्थान रॉयल्स संघाचा  हा 200 वा सामना असून त्यांच्या घरच्या मैदानावर होत आहे.

  • 27 Apr 2023 07:07 PM (IST)

    RR vs CSK Live : दोन्ही संघांची प्लेइंग 11

    राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेवन): यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सैमसन (w/c), शिमरोन हेटमेयर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, एडम ज़म्पा, संदीप शर्मा, युजवेंद्र चहल

    चेन्नई सुपर किंग्स (प्लेइंग इलेवन): ऋुतुराज गायकवाड, डेवॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोइन अली, अंबाती रायडू, शिवम दूबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कप्तान/कप्तान), मथीशा पथिराना, तुषार देशपांडे, महेश तीक्ष्णा

  • 27 Apr 2023 07:03 PM (IST)

    RR vs CSK Live : राजस्थानने जिंकला टॉस

    राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसन याने टॉस जिंकला आहे. प्रथम बॅटींग करण्याचा निर्णय घेतला आहे. सीएसके संघामध्ये कोणताही बदल नाही.

  • 27 Apr 2023 06:45 PM (IST)

    RR vs CSK Live :

     

     

     

  • 27 Apr 2023 06:39 PM (IST)

    RR vs CSK Live : दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

    चेन्नई सुपर किंग्ज – रुतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक), तुषार देशपांडे, महेश थिक्षाना, मथिशा पाथीराना, आकाश सिंग.

    राजस्थान रॉयल्स – जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टिरक्षक), शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, आर अश्विन, संदीप शर्मा, अॅडम झम्पा, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल.

  • 27 Apr 2023 06:13 PM (IST)

    RR vs CSK Live : दोन्ही संघांचे स्क्वॉड

    राजस्थान रॉयल्स संघ: यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (w/c), शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल, अब्दुल बासिथ, आकाश वसिष्ठ, डोनाव फेरेरा. , मुरुगन अश्विन, केएम आसिफ, रियान पराग, जो रूट, अॅडम झाम्पा, नवदीप सैनी, केसी करिअप्पा, ओबेद मॅकॉय, कुलदीप यादव, कुलदीप सेन, कुणाल सिंग राठौर

    चेन्नई सुपर किंग्ज संघ: रुतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, अंबाती रायुडू, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (w/c), मथीशा पाथिराना, तुषार देशपांडे, महेश थेक्षाना, आकाश सिंग, ड्वेन प्रेटोरिअस, ड्वेन प्रेटोरिअस सेनापती, शेख रशीद, आर.एस. हंगरगेकर, मिचेल सँटनर, अजय जाधव मंडल, प्रशांत सोळंकी, सिमरजीत सिंग, भगत वर्मा, निशांत सिंधू