RR vs DC IPL 2023 Score : राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सुरू असलेल्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 199 धावा केल्या आहेत.. सलामीला आलेल्या यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर यांच्या अर्धशतकांच्या जोरावर राजस्थानने 200 धावांचा टप्पा पार केला. शेवटला येत हेटमायरने 21 बॉलमध्ये 39 धावांची खेळी करत संघाला 200 च्या जवळ मजल मारून दिली. जयस्वालने 60 तर बटलरने 79 धावा केल्या.
गुवाहाटीमध्ये राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये सामना सुरू आहे. गुवाहाटी हे राजस्थानचं होम ग्राऊंड आहे. मात्र या मैदानावरील पहिल्या सामन्यामध्ये राजस्थानला पंजाब किंग्ज संघाकडून पराभव पत्कारावा लागला होता. त्यामुळे आजच्या सामन्यामध्ये विजय मिळवण्याचा राजस्थान प्रयत्न करेल. दोन्ही संघ हेड टू हेड टू हेड पाहिलं तर 21 वेळा आमनेसामने आले आहेत. तर यामध्ये दोन्ही संघानी 13 सामने जिंकले आहेत.
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेवन): डेविड वॉर्नर (W), मनीष पांडे, राइली रोसौ, रोवमन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), एनरिक नॉर्खिया, खलील अहमद, कुलदीप यादव आणि मुकेश कुमार
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेवन): जोस बटलर, यशस्वी जायसवाल, संजू सैमसन (C/W), रियान पराग, शिमरोन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, संदीप आणि युजवेंद्र चहल
दिल्लीच्या 36 धावांवर 3 विकेट्स गेल्या होत्या, त्यानंतर ललित यादव आणि डेव्हिड वॉर्नर यांनी मोठी भागीदारी केली होती. मात्र पुन्हा बोल्टने ललित यादवला 22 बॉलमध्ये 36 धावांवर माघारी पाठवत दिल्लीला आणखी एक झटका दिलाय. दिल्लीकडून आता अक्षर पटेल मैदानात आला आहे.
10 ओव्हरमध्ये 68-3
दिल्लीचे आता ललित यादव 14 आणि कर्णधार वॉर्नर मैदानात आहेत. मात्र 100 पेक्षा अधिक धावांची गरज दिल्लीला आहे.
दिल्ली संघाच्या विकेट गेल्यावर मैदानात रूसो आणि वॉर्नर यांनी सावध खेळ करत भागीदारी केली होती. मात्र आर, अश्विनने रूसोला बाद करत तिसरा धक्का देत दिल्लीला बॅकफूटवर ढकललं आहे. पॉवर प्लेमध्ये दिल्लीने सहा ओव्हर्समध्ये 3 विकेट्स गमावत 38 धावा केल्या आहेत.
पहिल्याच ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाला मोठे धक्के दिले आहेत. सलामीवीर पृथ्वी शॉ 0 आणि मनीष पांडे 0 यांना आऊट केलं आहे. दोघांनाही त्याने खातं उघडू दिलं नाही. बोल्टला हॅट्रिकची संधी होती मात्र रूसोने बचावात्मक खेळत हॅट्रिक होऊ दिली नाही. पहिल्या ओव्हरमध्ये दिल्लीच्या खेळाडूला सोडा संघालाही खातं उघडता आलं नाही.
सलामीला आलेल्या यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर यांच्या अर्धशतकांच्या जोरावर राजस्थानने 199 धावा केल्या आहेत. जयस्वालने 60 तर बटलरने 79 धावा केल्या. शेवटला येत हेटमायरने 21 बॉलमध्ये 39 धावांची खेळी करत संघाला 200 च्या जवळ मजल मारून दिली. दिल्लीला पहिला विजय मिळवण्यासाठी 200 धावांचं लक्ष्य पूर्ण करावं लागणार आहे.
स्कोर :18 ओव्हर 163-3
जोस बटलर शतकापासून 21 धावा दूर
राजस्थान रॉयल्सचा तिसरा गडी आऊट झाला आहे. लोकल बॉय रियान पराग 7 धावा करून बोल्ड झालाय. दिल्लीच्या रोवमन पॉवेलने त्याला तंबूचा मार्ग दाखवलाय.
स्कोर : 10 ओव्हर 103-2
चायनामन गोलंदाज कुलदीप यादव याने दिल्लीला दुसरी विकेट मिळवून दिली आहे. सॅमसन मोठा फटका मारण्याच्या नादात कॅच आऊट झाला. संजूला साधा भोपळाही फोडता आला नाही.
मुकेश कुमारने वादळी खेळी करणाऱ्या यशस्वी जयस्वालला आऊट केलं आहे. 31 चेंडूत त्याने 60 धावा केल्या यामध्ये त्याने 11 चौकार आणि 1 षटकार मारला. कर्णधार संजू सॅमसन आता मैदानात उतरला आहे.
राजस्थान संघाचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने 25 चेंडूत 50 धावा केल्या आहेत. या आक्रमक खेळीमध्ये त्याने तब्बल 11 चौकार मारलेत तर पहिल्याच ओव्हरमध्ये त्याने खलीलला तब्बल 5 चौकार मारत धमाकेदार सुरूवात केली होती.
राजस्थानची सुरुवात चांगली झाली असून त्यांनी अवघ्या 6 ओव्हरमध्ये 68 धावा केल्या आहेत. यशस्वी जैस्वाल नाबाद 41 आणि बटलर 24 नाबाद, दोघांनी एकूण 14 चौकार मारले आहेत.
पहिल्याच ओव्हरमध्ये जयस्वालने चांगली सुरुवात केली आहे. दिल्लीसाठी पहिले षटक टाकणाऱ्या खलील अहमदला त्याने 5 चौकार मारले.
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून दोन्ही संघांनी प्रत्येकी तीन बदल केले आहेत.
जोस बटलर राजस्थान संघात कायम, दुखापतीमुळे खेळणार नसल्याचं बोललं जात होतं. मात्र बटलर अंतिम 11 मध्ये आहे.