मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या हंगामात टाटा आयपीएलची अंतिम लढत गुजरातच्या अहमदाबादमधील (ahmedabad) भव्य नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) खेळवली जाणार आहे. 29 मे रोजी म्हणजेच रविवारी गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात विजेतेपदाची लढत होणार आहे. शुक्रवारी झालेल्या क्वालिफायर-2 सामन्यात राजस्थानने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सात गडी राखून पराभव केला. डियन प्रिमीयर लीगचा (IPL Qualifier 2) क्वालिफायर 2 चा सामना खूपच एकतर्फी झाला. राजस्थान रॉयल्सने RCB ने दिलेलं 158 धावांच टार्गेट आरामात पार केलं. राजस्थानच्या गोलंदाजांनी आपलं काम चोख बजावलं. त्यानंतर नेहमीप्रमाणे जोस बटलरने विजयी नायकाची आपली भूमिका पार पाडली. जोस बटलरने शानदार शतक झळकावलं. राजस्थानने सात विकेट राखून RCB वर विजय मिळवला. जोस बटलरने 60 चेंडूत नाबाद 106 धावा केल्या. यात 10 चौकार आणि 6 षटकार होते. बटलरने षटकार ठोकून राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. दरम्यान, गुजरात आणि राजस्थान या दोन संघातील हेड टू हेडचे आकडे जाणून घेऊया.
गुजरात टायन्स हा संघ आयपीएलमध्ये नवखा आहे. परंतु या संघाने अंतिम फेरिपर्यंत पोहचण्यासाठी क्रिकेटचा एक अप्रतिम बँड तयार केला आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स देखील आयपीएल 2022मध्ये खूपच सातत्यपूर्ण खेळताना दिसला. हे दोन संघ 14 एप्रिल आणि 24 मे रोजी दोनवेळा खेळले आहेत. दोनही वेळी गुजरातने विजेतेपद पटकावले आहे. 2-0 ने हेड टू हेडचा फायदा घेतला आहे. राजस्थानचा संघ 2008 नंतर कधीही फायलनमध्ये पोहोचलेला नाही. शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थानने आयपीएलचं पहिलं विजेतेपद मिळवलं होतं. पण त्यानंतर हा संघ प्लेऑफमध्येही सहजासहजी पोहोचू शकला नाही. 2018 नंतर राजस्थानच्या टीमने पहिल्यांदाच प्लेऑफमध्ये जागा मिळवली आहे.
आयपीएल अंतिम लढतीचे सर्वात स्वस्त तिकीट 800 रुपये तर सर्वात महागडे तिकीट 65 हजार रुपये किंमतीचे आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची प्रेक्षक क्षमता 1 लाख 32 हजार इतकी मोठी आहे. यंदाची आयपीएलची लढत रविवारी असल्याने हे स्टेडियम खचाखच भरण्याची दाट शक्यता आहे. आयपीएल आवडणाऱ्यांनी तिकिटावर उड्या घेत आधीच सर्व तिकीटे विकत घेतली आहे. त्यामुळे यंदा अहमदाबादमध्ये रविवारी आयपीएल फायनलच्या तिकिटांचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.
आता फायनलमध्ये कोणता संघ विजयी होतो आणि आयपीएलच्या पंधराव्या सीजनचा विजेता ठरतो याकडे देखील क्रिकेटप्रेमांचं लक्ष्य लागून आहे.