मुंबई : राजस्थानला घरच्या मैदानावर वाईट पराभवाला सामोरे जावे लागले आहे. सवाईमान सिंग स्टेडियमवर झालेल्या सामन्यात गुजरातने राजस्थानचा नऊ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात गुजरातसमोर राजस्थानचा संघ कुठेही टिकला नाही. गुजरातने आपल्या गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर राजस्थानला 17.5 षटकांत 118 धावांत रोखले होते. यानंतर विद्यमान विजेत्या संघाने 13.5 षटकांत एक गडी गमावून हे लक्ष्य गाठले. गुजरातकडून वृद्धिमान साहाने नाबाद 41, कर्णधार हार्दिक पंड्याने 15 चेंडूत नाबाद 39 धावा केल्या.
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (w/c), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, अॅडम झम्पा, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): ऋद्धिमान साहा, हार्दिक पांड्या (c), विजय शंकर, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी, जोशुआ लिटल
राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यामध्ये गुजरात संघाने 9 विकेट्सने विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाचा डाव 118 धावांवर गुंडाळला. संघाच्या टॉप ऑर्डरने गुजरातच्य गोलंदाजांसमोर नांगी टाकली. या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात संघाने 9 विकेट्स राखून 14 व्या ओव्हरमध्ये लक्ष्य पूर्ण केलं.
गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या तुफानी फलंदाजी करत आहे. हार्दिक सात चेंडूत २४ धावांवर खेळत आहे. त्याने एक चौकार आणि तीन षटकार मारले आहेत. तर साहा 36 धावांवर खेळत आहे. 11 षटकांनंतर गुजरातची धावसंख्या एका विकेटवर 96 धावा आहे.
गुजरात टायटन्सची पहिली विकेट 10 व्या षटकात 71 धावांवर पडली. शुबमन गिल 35 चेंडूत 36 धावा करून बाद झाला. गिलला युझवेंद्र चहलने बाद केले.
राजस्थान रॉयल्सला 8 वा धक्का 96 च्या स्कोअरवर शिमरॉन हेटमायरच्या रूपाने बसलाय. राशिद खानने हेटमायरला 7 धावांवर एलबीडब्ल्यू करून पॅव्हेलियनमध्ये पाठवलं आहे. आता बोल्ट आणि झाम्पा फलंदाजी करत आहेत.
12 Over 82-6
चांगली सुरुवात केल्यानंतर, राजस्थान रॉयल्सचा संघाच्या विकेट्स पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. रियान पराग 4 धावा, देवदत्त पडिक्कल 12 धावा करून परतले आहेत. आता ध्रुव जुरेल आणि हेटमायर मैदानात आहेत.
20 चेंडूत 30 धावा करून संजू सॅमसन बाद झाला. जोशुआ लिटलने सॅमसनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर आर अश्विनला राशिदने बोल्ड आऊट करत चौथा धक्का दिला आहे.
राशीद खान सहावी ओव्हर टाकायला आला होता. पहिल्याच चेंडूवर यशस्वी जयस्वाल 14 धावांवर रन आऊट झाला. 47 धावांवर राजस्थानने दुसरी विकेट गमावली.
मोहम्मद शमीने पहिल्या षटकात फक्त दोन धावा दिल्या. यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर दोघेही शमीविरुद्ध संघर्ष करताना दिसले होते. दुसऱ्या ओव्हरमध्ये हार्दिक पांड्या याने बटलर (8 धावा) याला आऊट करत पहिला धक्का दिला आहे.
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (w/c), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, अॅडम झम्पा, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): ऋद्धिमान साहा, हार्दिक पांड्या (क), विजय शंकर, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी, जोशुआ लिटल
राजस्थान रॉयल्स संघाने टॉस जिंकला आहे. कर्णधार संजू सॅमसन याने प्रथम बॅटींग करण्याचा निर्णय घेतला आहे.
जर आपण दोन संघांमधील हेड टू हेड आकडेवारी पाहिली तर गुजरात मजबूत आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 4 सामने झाले आहेत. त्यामध्ये गुजरातने 3, तर राजस्थानने 1 विजय मिळवला आहे. गेल्या वर्षी झालेल्या तिन्ही सामन्यांमध्ये गुजरातने राजस्थानचा पराभव केला होता.