जयपूर | आयपीएल 16 व्या मोसमात आज रविवारी 7 मे रोजी डबल हेडरचं आयोजन करण्यात आलं. या डबल हेडरमधील पहिला सामना हा गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात पार पडला. तर यानंतर दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने होते. या सामन्याचं आयोजन हे जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. राजस्थानचा यंदाच्या मोसमातला हा 11 वा तर सनरायजर्स हैदराबाद टीमचा 10 वा सामना होते. राजस्थान रॉयल्सने हैदराबादला विजयासाठी 215 धावांचं आव्हान दिलं होतं. हैदराबादने शानदार पद्धतीने या धावांचा पाठलाग केला. हैदराबादला शेवटच्या बॉलवर 5 धावांची गरज होती. तेव्हा संदीप शर्मा याने अब्दुल समद याला कॅच आऊट केलं. मात्र तो बॉल नो बॉल होता. त्यामुळे हैदराबादला विजयासाठी 1 बॉलमध्ये 4 धावांची गरज होती. तेव्हा समद कडक सिक्स ठोकत हैदराबादला थरारक विजय मिळवून दिला. संदीप शर्मा याचा एक न बॉल गेमचेंजर ठरला.
सनरायजर्स हैजराबादने राजस्थान रॉयल्सवर 4 विकेट्सने सनसनाटी विजय मिळवला आहे. हैदराबादला विजयासाठी शेवटच्या बॉलवर 4 धावांची गरज होती. तेव्हा अब्दुल समद याने संदीप शर्मा याच्या बॉलवर सिक्स ठोकत हैदराबादला सनसनाटी विजय मिळवून दिला.
हैदराबादला विजयासाठी 1 बॉलमध्ये 5 धावांची गरज असताना अब्दुल समद याने फटका मारला. मात्र तो कॅच आऊट झाला. पण संदीप शर्मा याने टाकलेला बॉल नोबॉल होता. त्यामुळे 1 धावा मिळाली. त्यामुळे शेवटच्या बॉलवर 4 धावांची गरज आहे.
हैदराबादला विजयासाठी 1 बॉलमध्ये 5 धावांची गरज आहे. अब्दुल समद स्ट्राईकवर आहे.
हैदराबादला विजयासाठी 2 बॉलमध्ये 6 धावांची गरज आहे.
अब्दुल समद याने 20 ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर कडक सिक्स मारला, त्यामुळे आता हैदराबादला विजयासाठी 4 बॉलमध्ये 9 धावांची गरज आहे.
हैदराबादला विजयासाठी 6 बॉलमध्ये 17 धावांची गरज आहे. हैदराबादकडून एम यानसन आणि अब्दुल समद हे दोघे खेळत आहेत. तर संदीप शर्मा शेवटची आणि निर्णायक ओव्हर टाकत आहे.
ग्लेन फिलीप्स याने सामन्यातील 19 व्या ओव्हरमध्ये कुलदीप यादव याच्या बॉलिंगवर पहिल्या 3 बॉलमध्ये सलग 3 सिक्स ठोकले. तर चौथ्या बॉलवर चौकार ठोकला. मात्र कुलदीप यादवने पाचव्या बॉलवर ग्लेन फिलिप्स आऊट झाला. ग्लेन फिलिप्सयाने 7 बॉलमध्ये 25 धावा केल्या. त्यामुळे सामना आणखी रंगतदार झाला.
युजवेंद्र चहलने हैदराबादला चौथा झटका दिला आहे. राहुल त्रिपाठी 47 धावा करुन आऊट झाला.
हैदराबादला शेवटच्या 5 ओव्हरमध्ये विजयासाठी 69 धावांची गरज आहे. हैदराबादने 15 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 146 धावा केल्या आहेत.
हैदराबादने दुसरी विकेट गमावली आहे. अभिषेक शर्मा 33 बॉलमध्ये 5 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने 55 धावांची अर्धशतकी खेळी केली.
हैदराबादने सलामी अर्धशतकी भागीदारीनंतर पहिली विकेट गमावली आहे. अनमोलप्रीत सिंह याने 25 बॉलमध्ये 33 धावांची खेळी केली.
हैदराबादची 215 धावांचा पाठलाग करताना आश्वासक सुरुवात झाली आहे. हैदराबादच्या सलामी जोडीने 5 ओव्हरमध्ये 45 धावांची सलामी भागीदारी केली आहे.
Anmol with a 4⃣ now ?
— SunRisers Hyderabad (@SunRisers) May 7, 2023
Nattu off after bowling some more beautiful yorkers at the death yet again!
IMPACT SUB TIME ?
— SunRisers Hyderabad (@SunRisers) May 7, 2023
जॉस बटलर आणि संजू सॅमसन या दोघांनी केलेल्या वादळी खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने सनरायजर्स हैदराबादला विजयासाठी 215 धावांचं मजबूत टार्गेट दिलंय. राजस्थानकडून जॉस बटलर याने सर्वाधिक 95 धावांची खेळी केली. बटलरने 59 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 10 चौकारांच्या मदतीने या धावा केल्या. संजू सॅमसनने 38 बॉलमध्ये 4 चौकार आणिन 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 66 रन्स केल्या. यशस्वी जयस्वाल याने 18 बॉलमध्ये 5 कडक फोर आणि 2 गगनचुंबी सिक्सच्या मदतीने वेगवान 35 धावा केल्या. तर शिमरॉन हेटमायर याने नाबाद 7 धावा केल्या. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार आणि मार्को जान्सेन या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
राजस्थानला दुसरा धक्का लागला आहे. जॉस बटलर याने 59 बॉलमध्ये 95 धावा केल्या. बटलरचं अवघ्या 5 धावांसाठी शतक हुकलं.
संजू सॅमसन याने हैदराबाद विरुद्ध 33 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं आहे. संजूचं हे या मोसमातील सलग चौथं अर्धशतक ठरलं.
संजू सॅमसन आणि जॉस बटलर या जोडीने 61 बॉलमध्ये शतकी भागीदारी केली आहे. यासह राजस्थान मजबूत स्थितीत पोहचली आहे.
जॉस बटलर याने 32 बॉलमध्ये संयमी अर्धशतक पूर्ण केलं आहे. बटलरचं हे या मोसमातील चौथं अर्धशतक ठरलं आहे.
राजस्थान रॉयल्सच्या जॉस बटलर आणि संजू सॅमसन या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी केली आहे.
यशस्वी जयस्वाल आणि जॉस बटलर या सलामी जोडीने राजस्थानसाठी 54 धावांची भागीदारी केली. मात्र यशस्वी 35 धावा करुन आऊट झाला. यशस्वीने फक्त 18 बॉलमध्ये 5 चौकार आणि 2 सिक्सच्या मदतीने या धावा केल्या.
राजस्थान रॉयल्सच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. यशस्वी जयस्वाल आणि जॉस बटलर ही सलामी जोडी मैदानात खेळत आहेत. राजस्थानच्या कॅप्टन संजू सॅमसन याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.
सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन | अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (क), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, मार्को जॅनसेन, विव्रत शर्मा, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन
राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन | संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, जो रूट, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, मुरुगन अश्विन, संदीप शर्मा, कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल.
राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकला आहे. कॅप्टन संजू सॅमसन याने पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता राजस्थान घरच्या मैदानात किती मोठा स्कोअर करणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैजराबाद हो दोन्ही संघ आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 17 वेळा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. यामध्ये राजस्थान आणि हैदारबाद हे दोन्ही संघ जवळपास तुल्यबळ आहे. राजस्थानने 17 पैकी 9 सामन्यात हैदराबादवर मात केली आहे. तर हैदराबादने 8 वेळा विजयश्री खेचून आणली आहे.
राजस्थान विरुद्ध हैदराबाद हे दोन्ही संघ या मोसमात दुसऱ्यांदा आमनेसामने आले आहेत. या आधी हे उभयसंघ 2 एप्रिलला भिडले होते. तेव्हा राजस्थानने हैदराबादवर 72 धावांच्या फरकाने विजय मिळवला होता.