जयपूर | आयपीएल 2023 पॉइंट्सटेबलमध्ये सनरायजर्स हैदराबाद शेवटच्या म्हणजेच दहाव्या क्रमांकावर आहे. या हैदराबादचा सामना चौथ्या क्रमांकावर असलेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध होणार आहे. जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियममध्ये हे दोन्ही संघ भिडणार आहेत. राजस्थान या मोसमात आतापर्यंत 10 पैकी 5 सामने जिंकले आहेत. तर हैदराबादला केवळ 3 वेळाच विजय साकारता आला आहे. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. या दोन्ही टीमची या सिजनमध्ये आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ आहे.
याआधी राजस्थान रॉयल्सने या हंगामातील आपला पहिला सामना हा सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध खेळला होता. या सामन्यात राजस्थानचा 72 धावांनी विजय झाला होता. त्या सामन्यात कॅप्टन संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल आणि जॉस बटलर या तिकडीने अर्धशतकी खेळी केली होती.
राजस्थान रॉयल्सने गेल्या सामन्यात उंचपुऱ्या जेसन होल्डर याच्या जागी एडम झॅम्पा याला संधी दिली होती. मात्र राजस्थानचा हा डाव चांगलाच फसला होता. तर राजस्थान पुन्हा एकदा रियान पराग याला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून संधी देऊ शकते. राजस्थान प्लेइंग इलेव्हनमध्ये रियान पराग याच्या जागी कुणार राठोड किंवा आकाश वशिष्ठ या दोघांपैकी एका कुणाला संधी देऊ शकते.
सनरायजर्स हैदराबाद टीम मॅनेजमेंट राजस्थानची खेळपट्टी पाहता संघात भुवनेश्वर कुमार, कार्तिक त्यागी आणि टी नटराजन या तिकडीपैकी कुणा दोघांना नक्कीच स्थान देईल. कदाचित कार्तिक त्यागी याला डच्चू मिळू शकतो, कारण त्याने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध खूप धावा लुटवल्या होत्या. याशिवाय मार्को यानसन आणि अकील हुसेन या दोघांनाही प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखव्यात येऊ शकतो.
जोस बटलर, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन, यशस्वी जायसवाल, संजू सॅमसन, मयंक अग्रवाल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, मयंक मार्कंडे, आर अश्विन आणि अभिषेक शर्मा या अकरा खेळाडूंच्या कामगिरीकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
राजस्थान रॉयल्स संभावित प्लेइंग इलेव्हन | संजू सॅमसन (कॅप्टन), जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, शिमरोन हेटमायर, ध्रुव जुरेल, जेसन होल्डर, आर अश्विन, युजवेंद्र चहल, ट्रेन्ट बोल्ट आणि संदीप शर्मा.
सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन | अभिषेक शर्मा, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडेन मार्कराम, हॅरी ब्रूक, हेनरिक क्लासेन, अब्दुल समद, मार्को यानसन/अकील हुसैन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे आणि कार्तिक त्यागी.