मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दौऱ्यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये वेगवेगळ्या कर्णधारांची निवड केली आहे. वन डे सामन्यांसाठी टीम इंडियाच्या कर्णधारपदासाठी के. एल. राहुल याची निवड केली आहे. व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना विश्रांती देण्यात आली आहे. वन डे सामन्यांसाठीही युवा खेळाडूंची निवड करण्यात आली असून केएल राहुलला नेतृत्त्व करण्याची संधी दिली आहे.
तीन वन डे सामन्यामध्ये टीम इंडियासाठी नव्या दमाचे खेळाडू ओपनिंग करताना दिसणार आहेत. यामध्ये महाराष्ट्राचा वाघ म्हणजे ऋतुराज गायकवाड सलामीला खेळताना दिसू शकतो. ऑस्ट्रेलियावरूद्धच्या टी-20 मालिकेमध्ये शतक करणाऱ्या ऋतुराजसाठी लॉटरी लागल्यासारखी आहे. त्याच्यासोबत आयपीएल फायनलमध्ये चेन्नईविरूद्ध 96 धावांची आक्रमक खेळी करणाऱ्या साई सुदर्शन याला ओपनिंग करण्याची संधी मिळू शकते.
बीसीसीआयने वन डे मालिकेसाठी निवडलेल्या संघामध्ये ओपनिंगला येणारा दुसरा कोणताही खेळाडू नाही. रजत पाटीदार एक पर्याय असेल मात्र दोघांच्या तुलनेमध्ये त्याला फार कमी संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऋतुराज गायकवाड आणि साई सुदर्शन हेच ओपनिग करताना दिसतील. भारताच्या भविष्याच्या विचार करता हे दोन खेळाडू महत्त्वाच आहेत.
India’s squad for 3 ODIs: Ruturaj Gaikwad, Sai Sudharsan, Tilak Varma, Rajat Patidar, Rinku Singh, Shreyas Iyer, KL Rahul (C)(wk), Sanju Samson (wk), Axar Patel, Washington Sundar, Kuldeep Yadav, Yuzvendra Chahal, Mukesh Kumar, Avesh Khan, Arshdeep Singh, Deepak Chahar.#SAvIND
— BCCI (@BCCI) November 30, 2023
दरम्यान, आयपीएलमध्ये महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्त्वात खेळणारा ऋतुराज वन डे मध्ये भारतासाठी ओपनिंग करेल. मुळचा पुण्यातील पुरंदर तालुक्यामधील असलेल्या ऋतुराजने एशियन गेम्समध्ये भारतीय संघाचं कर्णधारपदही भूषवलं आहे.
3 वनडेसाठी भारताचा संघ: ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, केएल राहुल (C&W), संजू सॅमसन (WK), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग, दीपक चहर