‘माझं स्वप्नय, गोल्ड मेडल जिंकून पोडियममध्ये राष्ट्रगीत गायचंय’; टीम इंडियाचा कॅप्टन ऋतुराजची पहिली प्रतिक्रिया!

| Updated on: Jul 15, 2023 | 7:35 PM

टीम इंडियाच्या कर्णधारपदी मराठमोळा खेळाडू ऋतुराज गायकवाड याची निवड झाली आहे. कर्णधारपदी निवड झाल्यावर आपली प्रतिक्रिया देताना त्याने देशासाठी गोल्ड मेडल जिंकायचं असल्याचं सांगितलं आहे.

माझं स्वप्नय, गोल्ड मेडल जिंकून पोडियममध्ये राष्ट्रगीत गायचंय; टीम इंडियाचा कॅप्टन ऋतुराजची पहिली प्रतिक्रिया!
Follow us on

मुंबई : यंदाची 19 वी एशियन गेम स्पर्धा चीनमधील होंगझाऊ या ठिकाणी पार पडणार आहे. एशिअन गेम्समध्ये क्रिकेटचाही समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने महिला आणि पुरूष संघांची घोषणा केली आहे. यामधील पुरूष क्रिकेट संघामध्ये युवा खेळाडूंचा टीममध्ये समावेश केलाय. कारण सप्टेंबरमध्ये प्रमुख संघाचं शेड्यूल आधीच ठरल्यामुळे एशियन गेम्समध्ये भारत- अ संघाला पाठवलं आहे. या संघाच्या कर्णधारपदी मराठमोळा खेळाडू ऋतुराज गायकवाड याची निवड झाली आहे. कर्णधारपदी निवड झाल्यावर त्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाला ऋतुराज गायकवाड?

देशासाठी मला सुवर्णपदक जिंकायचं असून त्यानंतर पोडिअममध्ये राष्ट्रगीत गायचं माझं स्वप्न असल्याचं ऋतुराज गायकवाडने सांगितलं आहे. ज्यांनी मला जबाबदारी दिली त्या सर्वांचे मनापासून आभार. मला अभिमान वाटतो की या मोठ्या स्पर्धेसाठी संघाचं नेतृत्त्व करणं माझ्यासाठी मोठी गोष्टी आहे. त्यासोबतच संघातील सर्वांना स्वत: ला सिद्ध करण्यासाठी मोठी संधी असणार असल्याचं ऋतुराजन म्हणाला.

दरम्यान,  वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी रिंकू सिंग यांची निवड झाली नव्हती. त्यामुळे चाहतेही नाराज झाले होते मात्र रिंकू सिंगची आता एशियन गेम्स स्पर्धेच्या टीम इंडियामध्ये निवड झाली आहे. 5 ऑक्टोबरपासून भारतामध्ये वर्ल्ड कप स्पर्धा असल्यामुळे बीसीसीआयने सर्व युवा संघ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

 

19 व्या एशियन गेम्ससाठी टीम इंडियाचा महिला संघ
हरमनप्रीत कौर (C), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (W), अमनजोत कौर, देविका वैद्य, अंजली सरवानी, तीतस साधू, राजेश्वरी गायकवाड, मिनू मणी, कनिका आहुजा, उमा छेत्री, अनिल छेत्री .

राखीव खेळाडू -: हरलीन देओल, काशवी गौतम, स्नेह राणा, सायका इशाक, पूजा वस्त्राकर

19 व्या एशियन गेम्ससाठी टीम इंडियाचा पुरूष संघ
टीम इंडिया | ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे आणि प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर)

राखीव खेळाडू -: यश ठाकूर, साई किशोर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा आणि साई सुदर्शन.