मुंबई : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेला सुरूवात व्हायला काही दिवस बाकी आहेत. या कसोटी मालिकेला सुरूवात होण्याआधी टीम इंडियााल मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून ज्याची भीती सर्वांना वाटत होती तेच झालंं आहे. टीम इंडियाचा स्टार खेळाडू बाहेर झाला आहे. टीमसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कोण आहे तो खेळाडू जाणून घ्या.
साऊथ आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी मालिकेमधून हा खेळाडू बाहेर झाला आहे. तो दुसरा तिसरा कोणी नसून ऋतुराज गायकवाड आहे. आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यामध्ये ऋतुराज गायकवाड याच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली होती. स्कॅनिंग करण्यात आल्यावर त्याला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. बीसीसीआय वैद्यकीय पथकाने गायकवाड याला बाहेर बसवण्याचा निर्णय घेतला.
🚨 NEWS 🚨
Ruturaj Gaikwad ruled out of the #SAvIND Test series.
The Selection Committee has added Rajat Patidar, Sarfaraz Khan, Avesh Khan & Rinku Singh to India A’s squad while Kuldeep Yadav has been released from the squad.
Details 🔽 #TeamIndia
— BCCI (@BCCI) December 23, 2023
बीसीसीआयने ऋतुराज गायकवाड याच्या जागी अभिमन्यू ईश्वरन याची संघात निवड केली आहे. साऊथ आफ्रिका अ संघाविरूद्ध तीन दिवसांनी चार दिवसांचा सामना होणार आहे. या टीममध्ये रजत पाटीदार, सरफराज खान, आवेश खान आणि रिंकू सिंग यांची निवड केली गेली आहे.
साऊथ आफ्रिका अ विरुद्धच्या चार दिवसीय सामन्यासाठी भारत अ संघ: अभिमन्यू ईश्वरन (C), साई सुदर्शन, रजत पाटीदार, सरफराज खान, तिलक वर्मा, ध्रुव जुरेल (W), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, आवेश खान, नवदीप सैनी, आकाश दीप, विद्वथ कवेरप्पा, मानव सुथार, रिंकू सिंग