Video : सीएसकेच्या माजी खेळाडूने आरसीबीची स्पर्धेआधीच काढली लाज, फॅन्सच्या जखमेवर चोळलं मीठ

| Updated on: Mar 20, 2025 | 4:06 PM

आयपीएल 2025 स्पर्धा अवघ्या काही तासांनी सुरु होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होत आहे. पण या सामन्यापू्र्वी सीएसकेच्या माजी खेळाडूने आरसीबीच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे.

Video : सीएसकेच्या माजी खेळाडूने आरसीबीची स्पर्धेआधीच काढली लाज, फॅन्सच्या जखमेवर चोळलं मीठ
विराट कोहली
Image Credit source: Twitter
Follow us on

आयपीएल 2025 स्पर्धेला 22 मार्चपासून सुरुवात होणार असून पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहे. हा सामना कोलकात्याच्य ईडन गार्डनवर होणार आहे. आरसीबी 17 वर्षात जेतेपदाचा जवळ पोहोचली पण त्याची चव काही चाखला आली नाही. असं असताना या सामन्याआधीच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम सुरु झालं आहे. मागच्या 17 पर्वात एकही जेतेपद नसल्याने आरसीबीला डिवचलं जात आहे. स्पर्धा सुरु होण्याआधीच आरसीबीवर मीम्स तयार होणं सुरु झालं आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्सचा माजी खेळाडूने एका इन्स्टाग्राम रीलच्या माधम्यातून आरसीबीच्या चाहत्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. माजी क्रिकेटपटू एस बद्रिनाथने एक मीम्स म्हणून रील तयार केला आहे. या माध्यमातून त्याने आरसीबीच्या कामगिरीची लाज काढली आहे.

मीम्समध्ये दाखवल्याप्रमाणे, एस बद्रीनाथ नऊ लोकांसमोर उभा आहे. या नऊ जणांना संघांचं प्रतिक दाखवलं आहे. तर स्वत:ला सीएसके म्हणून प्रतीत केलं आहे. व्हिडीओत सीएसकेचं प्रतिस्वरूप असलेला एस बद्रिनाथ एक एकाला हात मिळवत पुढे जातो.सर्वात आधी पंजाब किंग्सला हात मिळवतो. मग लखनौ सुपर जायंट्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद यांना हात मिळवत पुढे जातो. जेव्हा आरसीबीची प्रतिस्वरूप येतं तेव्हा मात्र त्याला हात न मिळवताच पुढे निघून जातो. पुढे उभ्या असलेल्या केकेआरला वाकून नमस्कार करतो. तर मुंबई इंडियन्सशी हस्तांदोलन करतो, पण जाताना हात झटकून जातो.

आरसीबी यंदा रजत पाटिदारच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. त्याच्या नेतृत्वात जेतेपदाच्या अपेक्षा आहेत. मात्र आता या स्पर्धेत आरसीबीची कामगिरी कशी राहते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आरसीबीचा पहिला सामना गतविजेता कोलकात्याशी होणार आहे. हा सामना 22 मार्चला होणार असून विराट कोहलीच्या कामगिरीकडे लक्ष लागून आहे.