एस श्रीसंतने निवडली ‘गरम डोक्याची’ ऑल टाईम प्लेइंग इलेव्हन, कोण कोण आहे ते जाणून घ्या

| Updated on: Sep 15, 2024 | 8:12 PM

भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस श्रीसंतने आपली ऑल टाईम प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. या संघात दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे. पण सर्व खेळाडू हे आक्रमक स्वभावाचे असल्याने या प्लेइंग इलेव्हनची चर्चा रंगली आहे. चला जाणून घेऊयात या संघात कोण कोण आहेत ते

एस श्रीसंतने निवडली गरम डोक्याची ऑल टाईम प्लेइंग इलेव्हन, कोण कोण आहे ते जाणून घ्या
Follow us on

गेल्या काही दिवसात ऑल टाईम प्लेइंग इलेव्हन निवडण्याचा ट्रेंड आला आहे. माजी क्रिकेटपटू आपल्या आवडत्या खेळाडूंसह ऑल टाईम प्लेइंग इलेव्हन निवडत आहे. या संघात आजी माजी दिग्गज खेळाडूंचा समावेश पाहायला मिळत आहे. त्यामुळे निवडलेल्या संघाला चॅलेंज करणं कठीण होतं. कारण कोणाला काढायचं आणि कोणाला ठेवायचा हा प्रश्न निर्माण होतं. पण भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस श्रीसंतने निवडलेल्या संघाची चर्चा रंगली आहे. खरं तर या संघाला त्याने ऑल टाईम शांत संघ असं नाव दिलं आहे. पण खेळाडूंची नाव वाचली तर शांत की आक्रमक हा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. या संघाची धुरा श्रीसंतने सौरव गांगुलीच्या खांद्यावर दिली आहे. तसेच या संघात स्वत:ला संधी दिली आहे. या संघात भारताच्या पाच खेळाडूंचा समावेश आहे. हे खेळाडू मैदानातील आक्रमकतेमुळे चर्चेत राहिले आहेत. सलामीवीर म्हणून विराट कोहली आणि गौतम गंभीर यांची नियुक्ती केली आहे. तसेच हरभजनला या संघात स्थान दिलं आहे.

भारताचे पाच, पाकिस्तानचे दोन, ऑस्ट्रेलिया 1, बांग्लादेश 1, वेस्ट इंडिज 1 आणि दक्षिण अफ्रिकेचा 1 खेळाडू आहे. पाकिस्तानकडून शाहिद आफ्रिदी आणि शोएब अख्तर, बांगलादेशकडून शाकीब अल हसन, ऑस्ट्रेलियाकडून रिकी पाँटिंग, वेस्ट इंडिजकडून किरन पोलार्ड आणि दक्षिण अफ्रिकेकडून आंद्रे नेलचा समावेश आहे. गौतम गंभीर आणि विराट कोहली हे ओपनिंगला उतरतील. रिकी पाँटिंग तिसऱ्या क्रमांकावर, सौरव गांगुली चौथ्या क्रमांकावर, शाहिद आफ्रिदी पाचव्या क्रमांकावर, शाकिब अल हसन सहाव्या क्रमांकावर, किरन पोलार्ड सातव्या क्रमांकावर, हरभजन सिंग आठव्या क्रमांकावर, शोएब अख्तर नवव्या क्रमांकावर, आंद्रे नेल दहाव्या क्रमांकावर तर एस श्रीसंत अकराव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरेल.

एस श्रीसंत याने निवडलेले सर्व खेळाडू मैदानात आक्रमक स्वभावासाठी ओळखले जातात. त्यांनी कधी ना कधी मैदानात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे हा संघ मैदानात उतरला तर राडा तर होणारच यात शंका नाही. हे खेळाडू आक्रमक तर आहेतच पण खेळातही मागे नाही. त्यांनी एक काळ गाजवला आहे.

एस श्रीसंतने निवडलेली ऑल टाईम प्लेइंग इलेव्हन : गौतम गंभीर, विराट कोहली, रिकी पाँटिंग, सौरव गांगुली, शाहिद आफ्रिदी, शाकिब अल हसन, किरन पोलार्ड, हरभजन सिंग, शोएब अख्तर, आंद्रे नेल आणि एस. श्रीसंत.