Ajinkya Rahane : स्पॉट फिक्सिंगमध्ये सापडलेल्या श्रीसंतने अजिंक्य रहाणेबाबत केलं मोठं वक्तव्य, म्हणाला…

| Updated on: May 04, 2023 | 9:02 PM

चमकदार कामगिरीच्या जोरावर अजिंक्यसाठी टीम इंडियाची दारे खुली झाली आहेत. WTC च्या फायनल सामन्यासाठी त्याला संघात स्थान देण्यात आलं आहे. अशातच अजिंक्य रहाणेबाबत स्पॉट फिक्सिंगध्ये सापडलेल्या एस. श्रीसंत याने मोठं वक्तव्य केलं आहे. 

Ajinkya Rahane : स्पॉट फिक्सिंगमध्ये सापडलेल्या श्रीसंतने अजिंक्य रहाणेबाबत केलं मोठं वक्तव्य, म्हणाला...
Follow us on

मुंबई : भारताचा स्टार खेळाडू अजिंक्य रहाणे याने  टीम इंडियाने जबरदस्त पुनरागनमन केलं आहे. आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळताना अजिंक्य रहाणे याने जबरदस्त प्रदर्शन केलं आहे. या चमकदार कामगिरीच्या जोरावर अजिंक्यसाठी टीम इंडियाची दारे खुली झाली आहेत. WTC च्या फायनल सामन्यासाठी त्याला संघात स्थान देण्यात आलं आहे. अशातच अजिंक्य रहाणेबाबत स्पॉट फिक्सिंगध्ये सापडलेल्या एस. श्रीसंत याने मोठं वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाला श्रीसंत? 

अजिंक्य रहाणेला मला वनडे वर्ल्ड कप संघामध्ये घेतलेलं पाहायला आवडेल. आता तो ज्या प्रकारे प्रदर्शन करत आहे त्यावरून तरी त्याला निवड समितीने त्याला संघात स्थान द्यायला हवं, असं एस श्रीसंत याने म्हटलं आहे.

मला खात्री आहे तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये चांगली कामगिरी करेल. या कामगिरीच्या जोरावर त्याला वनडे संघात पुन्हा एकदा संधी द्यायला हवी. देशासाठी पांढऱ्या चेंडूवर त्याला चौथ्या आणि पाचव्या स्थानावर खेळून मॅच जिंकवताना पाहिलं तर मला आश्चर्य वाटणार नाही, असंही श्रीसंत म्हणाला.

आता भारतीय संघामध्ये मधल्या फळीमध्ये श्रेअस अय्यर आणि ऋषभ पंत हे दोघेही संघाबाहेर आहेत. त्यामुळे रहाणेच्या नावाचा निवड समिती विचार करू शकते. रहाणेला कमालीचा अनुभव असून त्याने कित्येक दबाव असणारे सामने संघाला जिंकून दिले आहेत.

अजिंक्य रहाणेच्या याला मधल्या फळीत खेळतवावं असं श्रीसंतला वाटत असलं तरी दुसरीकडे रहाणेऐवजी ऋतुराज गायकवाड किंवा यशस्वी जयस्वालसारख्या खेळाडूंना संधी मिळायला हवी, असं लिटल मास्टर सुनील गावस्कर यांनी म्हटलं आहे.