मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचं प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. खेळाडूची कारकीर्द खऱ्या अर्थाने ऐन तिशीत बहरायला सुरुवात होते. तर कुणाच्या कारकीर्दीला वयाच्या 30 व्या वर्षापासून सुरुवात होते. मात्र एका खेळाडूने घेतलेल्या निर्णयामुळे क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडाली आहे.या खेळाडूने वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी निवृत्तीची घोषणा केली आहे. दुसऱ्या गोष्टीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केल्याचं या क्रिकेटरने म्हटलंय. टीमने एक पत्रक काढून खेळाडू्च्या निवृत्तीची माहिती दिली आहे.
थेनिसने क्रिकेटला अलविदा केला आहे. थेनिस याने 20 जानेवारी 2017 मध्ये श्रीलंका विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. हा टी 20 सामना होता. थेनिसने 13 कसोटी आणि 2 टी 20 सामन्यात देशाचं प्रतिनिधित्व केलं होतं. थेनिसने कसोटीत 1 शतक ठोकलं होतं. थेनिसने तसेच 2 टी सामन्यात 26 धावा केल्या होत्या.
लहानपणापासूनच दक्षिण आफ्रिकेसाठी खेळायचं स्वप्न होतं. माझं हे स्वप्न पूर्ण झाल्याचं थेनिसने पत्रकात म्हटलंय. “मी भाग्यवान आहे की मला देशाचं सर्वोच्च पातळीवर देशाचं प्रतिनिधित्व करता आलं. माझ्या करिअरमधील हा सर्वोच्च क्षण होता. मी लहानपणीचं स्वप्न पूर्ण केलं. मला माझ्या आदर्शांसोबत ड्रेसिंग रुम शेअर करता आलं. तसेच जगातील सर्वोत्तम स्टेडियममध्ये खेळता आलं. मला संधी मिळाली, त्याचं मी आभार मानू शकत नाही”, असं थेनिस म्हणाला.
थेनिस नुकताच दक्षिण आफ्रिकेतील SA20 लीग स्पर्धेत सहभागी झाला होता. थेनिस या स्पर्धेत प्रिटोरिया कॅपिट्ल्सचं प्रतिनिधित्व केलं.प्रिटोरियाने या स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली . थेनिसने या स्पर्धेत 238 धावा केल्या. थेनिस
थेनिसने एका टीममध्ये विराट कोहली याची जागा घेतली होती. विराट 2018 मध्ये इंग्लंडच्या काउंटी सरेकडून खेळणार होता. मात्र विराटने माघार घेतली होती. तेव्हा थेनिसचा समावेश करण्यात आला होता.तेव्हा काउंटीने थेनिसला विराटच्या जागी घेतलं होतं. तेव्हा थेनिसने 5 कसोटी सामने खेळला होता. यामध्ये त्याची 48 ही सर्वोच्च धावसंख्या राहिली होती.
थेनिसने 82 प्रथम श्रेणी सामन्यात 41.82 च्या सरासरीने 5 हजार 353 धावा केल्या होत्या. यामध्ये त्याने 16 शतकं तर 20 अर्धशतक ठोकली आहेत.