साऊथ आफ्रिका टी 20 लीग 2025 स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्स केप टाऊनचा फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हिस याने अप्रतिम सुरुवात केली आहे. डेवाल्ड ब्रेव्हिस याने सनरायजर्स इस्टर्नविरुद्धच्या सामन्यात सेंट जॉर्ज पाक, गेबेरहा येथे झंझावाती खेळी केली. डेवाल्ड ब्रेव्हिसने या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात अर्धशतक झळकावण्याचा मान मिळवला. डेवाल्डने या सामन्यात 57 धावांची तडाखेदार खेळी केली. डेवाल्डने या दरम्यान मैदानात चौफेर फटकेबाजी केली. डेवाल्डने प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली.
सनरायजर्स ईस्टर्न केपने टॉस जिंकून एमआय केप टाऊनला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मात्र एमआय केप टाऊनला काही खास सुरुवात करता आली नाही. एमआयने 42 धावांवर 3 विकेट्स गमावल्या. त्यानंतर डेवाल्ड मैदानात आला. डेवाल्डने त्यानंतर टॉप गिअरमध्ये बॅटिंग करत टीमला बॅक फुटवरुन फ्रंट फूटवर आणण्यात निर्णायक भूमिका बजावली. डेवाल्डने अवघ्या 23 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं. डेवाल्डला आणखी मोठी खेळी करण्याची संधी होती. मात्र डेवाल्डला अर्धशतकानंतर फार वेळ मैदानात तग धरता आला नाही. डेवाल्ड अर्धशतकानंतर 7 धावा जोडून मैदानाबाहेर गेला. डेवाल्डने 29 बॉलमध्ये 196.55 च्या स्ट्राईक रेटने 6 सिक्स आणि 2 फोरसह 57 धावा केल्या.
डेवाल्ड ब्रेव्हिसचा अर्धशतकी तडाखा
A well entertaining 57 runs from 29 balls for Dewald Brevis under pressure 💥💥
DB announced his redemption in style well played starboy 👏👏#BetwaySA20 pic.twitter.com/fgLDITFgIs— Mumbai Indians FC (@MIPaltanFamily) January 9, 2025
सनरायझर्स ईस्टर्न केप प्लेइंग ईलेव्हन : एडन मार्करम (कर्णधार), जॉर्डन हर्मन, झॅक क्रॉली, टॉम अबेल, ट्रिस्टन स्टब्स (विकेटकीपर), डेव्हिड बेडिंगहॅम, बेयर्स स्वानेपोएल, मार्को जॅन्सन, लियाम डॉसन, सायमन हार्मर आणि रिचर्ड ग्लीसन.
मुंबई इंडियन्स केप टाऊन प्लेइंग इलेव्हन : राशीद खान (कर्णधार), रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, डेवाल्ड ब्रेव्हिस, कॉलिन इंग्राम, कॉनर एस्टरहुइझेन (विकेटकीपर), डेलानो पॉटगिएटर, अझमतुल्ला ओमरझाई, जॉर्ज लिंडे, कॉर्बिन बॉश आणि ट्रेन्ट बोल्ट.