अहमदाबाद | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 42 व्या सामन्यात अफगाणिस्तानने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 245 धावांचे आव्हान दिलं आहे. अफगाणिस्तानने 50 ओव्हरमध्ये ऑलआऊट 244 धावा केल्या. अफगाणिस्तानचं वर्ल्ड कपमधून पॅकअप झालंय. मात्र साखळी फेरीतील अखेरचा सामना जिंकून शेवट गोड करण्याचा प्रयत्न अफगाणिस्तानचा असणार आहे. अफगाणिस्तानच्या गोटात 4 धोकादायक स्पिनर आहेत. त्यामुळे अफगाणिस्तान दक्षिण आफ्रिकेला गुंडाळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिका या 245 धावांचं यशस्वी पाठलाग करते की अफगाणिस्तान यशस्वी ठरते, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
अफगाणिस्तानकडून अझमतुल्लाह ओमरझई याने सर्वाधिक नाबाद 97 धावांची खेळी केली. अवघ्या 3 धावांसाठी त्याचं शतक अधुरं राहिलं. अझमतुल्लाह याने 107 बॉलमध्ये 7 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 97 धावा केल्या. त्याशिवाय काही फलंदाजांचा सुरुवात मिळाली. मात्र त्यांना विशेष काही करता आलं नाही. नूर अहमद आणि रहमत यो दोघांनी प्रत्येकी 26 धावांची खेळी केली. गुरुबाज 25 धावांवर आऊट झाला. राशिद खान याने 14 आणि इब्राहीम झद्रान 15 धावांचं योगदान दिलं. इक्रम अलीखिल याने 12 धावा केल्या.तर मुजीबने 8, नवीन उल हक, मोहम्मद नबी आणि कॅप्टन हशमतुल्लाह शाहिदी या तिघांनी प्रत्येकी 2-2 धावा केल्या.
तर दक्षिण आफ्रिकाकडून गेराल्ड कोएत्झी याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. लुंगी एन्गिडी आणि केशव महाराज या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेत कोएत्झी याला चांगली साथ दिली. तर फेहुलकोवायो याच्या खात्यात 1 विकेट गेली.
अफगाणिस्तानकडून आफ्रिकेला 245 धावांचं आव्हान
TARGET SET! 🎯@AzmatOmarzay scored an incredible 97* (107) to power #AfghanAtalan to 244/10 in the first inning. @Noor_Ahmad_15 (26) and @RahmatShah_08 (26) were the other batters contributing to the total. 👏
Over to our bowlers now…! 👍#CWC23 | #AFGvSA | #WarzaMaidanGata pic.twitter.com/ksmMht5yxy
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) November 10, 2023
दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडेन मार्कराम, हेनरिक क्लासेन, अँडिले फेहलुकवायो, डेव्हिड मिलर, गेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी.
अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानुउल्लाह गुरबाज, इब्राहिम जद्रान, रहमत शाह, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, रशीद खान, इक्रम अलीखिल (विकेटकीपर), मुजीब उर रहमान, नूर अहमद आणि नवीन-उल-हक.