आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यात आहे. या नवव्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान आमनेसामने असणार आहे. अफगाणिस्तानने ए आणि दक्षिण आफ्रिकेने बी या सुपर 8 च्या ग्रुपमधून सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. राशिद खान अफगाणिस्तानचं नेतृत्व करणार आहे. तर एडन मारक्रम दक्षिण आफ्रिकेची कॅप्टन्सी करणार आहे. अफगाणिस्तानची सेमी फायनलमध्ये पोहचण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर दक्षिण आफ्रिका याआधी अनेकदा सेमी फायनलमध्ये पोहचली आहे. मात्र दोन्ही संघांमध्ये एकच साम्य आहे की अंतिम फेरीत पोहचता आलेलं नाही. त्यामुळे हा सामना जिंकणारा संघ पहिल्यांदाच फायनलमध्ये धडकणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये जोरदार चढाओढ पाहायला मिळणार आहे.हा सामना कुठे-कधी पाहता येणार? हे जाणून घेऊयात.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान सामना गुरुवारी 27 जून रोजी होणार आहे.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान सामना ब्रायन लारा स्टेडियम, तारौबा, त्रिनिदाद येथे आयोजित करण्यात आला आहे.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वाजता सुरुवात होईल. तर 5 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान सामना टीव्हीवर डीडी स्पोर्ट्सवर पाहायला मिळेल. तसेच स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान सामना मोबाईलवर डिज्ने प्लस हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
दक्षिण आफ्रिका टीम : एडन मार्करम (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे, तबरेझ शम्सी, ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, ब्योर्न फॉर्च्युइन आणि रायन रिकेल्टन.
अफगाणिस्तान टीम : राशीद खान (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, अजमतुल्ला उमरझई, गुलबदिन नायब, मोहम्मद नबी, करीम जनात, नांगेलिया खरोटे, नूर अहमद, नवीन-उल-हक, फझलहक फारुकी, नजीबुल्ला झदरन, फरीद अहमद मलिक, हजरतुल्ला झझई आणि मोहम्मद इशाक.