आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील पहिल्या सेमी फायनल सामन्यात दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानला गुंडाळलं आहे. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर अफगाणिस्तानच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा डाव 11.5 ओव्हरमध्ये 56 धावांवर गुंडाळला. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी अवघ्या 57 धावांची गरज आहे. आता अफगाणिस्तानचे गोलंदाज दक्षिण आफ्रिकेप्रमाणेच गोलंदाजी करुन काही चमत्कार करणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे.
अफगाणिस्तानचा कॅप्टन राशिद खान याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानच्या सलामी जोडीने या स्पर्धेत टीमला आश्वासक सुरुवात करुन दिली. मात्र या सामन्यात अफगाणिस्तानची सलामी जोडी अपयशी ठरली आणि त्यानंतर घसरगुंडी झाली. दक्षिण आफ्रिकेच्या धारदार गोलंदाजीसमोर अफगाणिस्तानच्या एकाही फलंदाजाला सामना करता आला नाही. अफगाणिस्तानसाठी अझमतुल्लाह ओमरझई याने सर्वाधिक 10 धावा केल्या. तिघांना भोपळाही फोडता आला नाही. 6 जणांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तर फझलहक फारुकी 2 धावांवर नाबाद परतला.
दक्षिण आफ्रिकेच्या एकूण 5 जणांनी बॉलिंग केली, त्यापैकी चौघांच्या खात्यात विकेट्स गेल्या. मार्को जान्सेन आणि तबरेझ शम्सी या दोघांनी सर्वाधिक 3-3 विकेट्स घेतल्या. तर कगिसो रबाडा आणि एनरिच नॉर्खिया या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेत अफगाणिस्तानला ऑलआऊट करण्यात मोठी भूमिका बजावली.
टी 20 वर्ल्ड कप बाद फेरीतील निच्चांकी धावसंख्या
Afghanistan’s T20 World Cup dream has been crushed by South Africa’s quicks in Tarouba 😬
MORE 👉 https://t.co/Qs5l2JLSaj#T20WorldCup pic.twitter.com/SGuYzxTizc
— Fox Cricket (@FoxCricket) June 27, 2024
दरम्यान टी 20 वर्ल्ड कप नॉक आऊट इतिहासातील अफगाणिस्तानची ही सर्वात निच्चांकी धावसंख्या ठरली आहे. याआधी हा नकोसा विक्रम संयुक्तरित्या विंडिज आणि श्रीलंकेच्या नावावर होता.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन : एडन मारक्रम(कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जान्सेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्खिया आणि तबरेझ शम्सी.
अफगाणिस्तान प्लेइंग ईलेव्हन: राशीद खान (कर्णधार), रहमानउल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, अजमतुल्ला उमरझाई, गुलबदिन नायब, मोहम्मद नबी, करीम जनात, नांगेलिया खरोटे, नूर अहमद, नवीन-उल-हक आणि फजलहक फारुकी.