SA vs AFG | क्विंटन डीकॉक याने अफगानिस्तान विरुद्ध रचला इतिहास

| Updated on: Nov 10, 2023 | 11:52 PM

Quinton De Kock South Africa vs Afghanistan | क्विंटन डी कॉक याने केलेल्या कामगिरीमुळे सेमी फायनलआधी ऑस्ट्रेलियाच्या पायाखालची जमीन सरकली आहे. डी कॉकने नक्की असं केलंय तरी काय?

SA vs AFG | क्विंटन डीकॉक याने अफगानिस्तान विरुद्ध रचला इतिहास
सर्वाधिक धावांबाबत दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक आहे. क्विंटनने या वर्ल्ड कपमध्ये 4 शतकांसह 591 धावा केल्या.
Follow us on

अहमदाबाद | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 42 वा सामना दक्षिण आफ्रिकेने रडत रडत जिंकला. अफगाणिस्तानने विजयासाठी दिलेलं 245 धावांचं आव्हान दक्षिण आफ्रिकेने 5 विकेट्स गमावून अखेरच्या टप्प्यात 47.3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. दक्षिण आफ्रिकेचा हा वर्ल्ड कपमधील सातवा विजय ठरला. तर अफगाणिस्तानचं वर्ल्ड कपमधून पॅकअप झालं. दक्षिण आफ्रिकेच्या विकेटकीपर बॅट्समन क्विंटन डी कॉक याने अफगाणिस्तान विरुद्धच्या या सामन्यात इतिहास रचला. क्विंटन दक्षिण आफ्रिकेसाठी वर्ल्ड कप इतिहासात अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू ठरला.

क्विंटन डी कॉक वर्ल्ड कपमधील एका सामन्यात सर्वाधिक कॅच घेणारा दक्षिण आफ्रिकेचा पहिला विकेटकीपर ठरलाय. त्याने याबाबत माजी विकेटकीपर मार्क बाऊचर याला मागे टाकलं. क्विंटनने अफगाणिस्तान विरुद्ध तब्बल 6 कॅचेस घेतल्य. क्विंटनने इब्राहीम झद्रान, कॅप्टन हशमतुल्लाह शाहिदी, इक्रम अलीखिल, मोहम्मद नबी, राशिद खान आणि नूर अहमद यांना कॅच आऊट केलं.

क्विंटनने यासह 2 दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरीही केली. क्विंटनने ऑस्ट्रेलियाचा आणि पाकिस्तानचा माजी विकेटकीपर एडम गिलख्रिस्ट आणि सरफराज अहमद या दोघांच्या विक्रमाची बरोहरी केली. या दोघांनीही वर्ल्ड कपमधील एका सामन्यात सर्वाधिक फलंदाजांना विकेटकीपर म्हणून आऊट केलं होतं.

दरम्यान दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया विरुद्ध सेमी फायनल खेळणार आहे. त्यामुळे आता सर्वाधिक धोका ऑस्ट्रेलियाला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना क्विंटन डी कॉकपासून जरा जपूणच रहावं लागणार आहे.

क्विंटन डी कॉकचा रेकॉर्ड

दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडेन मार्कराम, हेनरिक क्लासेन, अँडिले फेहलुकवायो, डेव्हिड मिलर, गेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी.

अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानुउल्लाह गुरबाज, इब्राहिम जद्रान, रहमत शाह, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, रशीद खान, इक्रम अलीखिल (विकेटकीपर), मुजीब उर रहमान, नूर अहमद आणि नवीन-उल-हक.