मुंबई | आयसीसी वनडे क्रिकेट वर्ल्ड कप 2023 आधी दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेला आज 7 जुलैपासून सुरुवात झाली. या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन टेम्बा बावुमा याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध झुंजार शतकी खेळी केली. टीम अडचणीत असताना टेम्बाने एकाकी झुंज दिली. इतकंच नाही, तर तो अखेरपर्यंत मैदानात लढला. टेम्बाला दुसऱ्या एन्डवरुन अपेक्षित साथ मिळाली नाही.मात्र टेम्बाने त्यापुढे जाऊन लढत दिली. टेम्बाने केलेल्या या शतकी खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला सन्मानजनक आव्हान देता आलं.
ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून आफ्रिकेला बॅटिंगसाठी भाग पाडलं. बॅटिंगसाठी बावुमा आणि क्विंटन डी कॉक सलामी जोडी मैदानात आली. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला झटक्यावर झटके दिले. ऑस्ट्रेलियाच्या माऱ्यासमोर टेम्हबाशिवाय एकालाही लढत देता आली नाही. मात्र छोट्या छोट्या भागीदाऱ्या झाल्या. टेम्बाने एक एक धाव करत शतक पूर्ण केलं. टेम्बाने 136 बॉलमध्ये 11 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने शतक पूर्ण केलं. टेम्बाच्या वनडे करियरमधील पाचवं शतक ठरलं.
त्यानंतर टेम्बा एकाकी किल्ला लढवत होता. टेम्बा एक एक धाव करत होता. मात्र दुसऱ्या टोकावरुन कुणाकडूनही साथ मिळाली नाही. त्यामुळे दक्षिण आफ्रिका 49 ओव्हरमध्ये 222 धावांवर ऑलआऊट झाली. मात्र टेम्बा अखेरपर्यंत नाबाद राहिला. आफ्रिकेकडून टेम्बाने सर्वाधिक 142 बॉलमध्ये 14 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने नाबाद 114 धावा केल्या. टेम्बाच्या शतकाच्या जोरावर 200 पार मजल मारता आली.
टेम्बा बावुमा याचं शतक
1️⃣0️⃣0️⃣ UP! GO ON SKIP
A 𝑩𝑹𝑰𝑳𝑳𝑰𝑨𝑵𝑻 performance from Temba Bavuma to earn a century off 116 balls👏 🇿🇦#SAvAus #BePartOfIt pic.twitter.com/pnXdqk3er6
— Proteas Men (@ProteasMenCSA) September 7, 2023
टेम्बाशिवाय आफ्रिकेकडून मार्को जान्सेन याने 32, एडन मार्करम याने 19, हेनरिक क्लासेन 14, क्विटंन डी कॉक 11 धावांचं योगदान दिलं. दोघांना भोपळाही फोडता आला नाही. तर चौघांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूड याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. मार्कस स्टोयनिस याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर सीन एबोट, एश्टन एगर, एडम झॅम्पा आणि कॅमरुन ग्रीन या चौकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | मिचेल मार्श (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, जोश इंग्लिस, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मार्कस स्टॉयनिस, शॉन अॅबॉट, अॅश्टन अगर, जोश हेझलवूड आणि एडम झाम्पा.
दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | टेम्बा बावुमा (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी.