World Cup 2023 | वर्ल्ड कपच्या 47 दिवसांआधी टीमला मोठा झटका, 2 खेळाडू दुखापतीमुळे ‘आऊट’

| Updated on: Aug 18, 2023 | 4:21 PM

World Cup 2023 | वर्ल्ड कपआधी अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. टीममधील 2 खेळाडू दुखापतीमुळे बाहेर झाले आहेत.

World Cup 2023 | वर्ल्ड कपच्या 47 दिवसांआधी टीमला मोठा झटका, 2 खेळाडू दुखापतीमुळे आऊट
तीन दिवसांच्या एकदिवसीय मालिकेमध्ये भारतीय संघाचा तब्बल 10 विकेट्सने पराभव झालेला पाहायला मिळाला होता. हा सामना 19 मार्च 2023 दिवशी झाला होता.
Follow us on

मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 ला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी बहुप्रतिक्षित आशिया कप स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. आशिया कप 30 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या आशिया कपमध्ये एकूण 6 संघ सहभागी होणार आहेत. त्यापैकी नेपाळ, बांगलादेश आणि पाकिस्तान या 3 क्रिकेट टीमने संघ जाहीर केला आहे. तर अफगाणिस्तान, श्रीलंका आणि भारतीय क्रिकेट संघाने टीम जाहीर केलेली नाही. केएल राहुल आणि श्रेयस अय्यर या दोघांच्या दुखापतीमुळे बीसीसीआय निवड समितीने अद्याप भारतीय संघाची घोषणा केलेली नाही. या दरम्यान क्रिकेट विश्वातून वाईट बातमी समोर आली आहे. टी 20 मालिकेआधी टीमला मोठा झटका लागला आहे.

टीमला एकाच वेळी डबल झटका लागला आहे. टीमचे 2 खेळाडू हे दुखापतीच्या कचाट्यात अडकले आहेत. या दुखापतीमुळे हे दोघे मालिकेतून बाहेर पडले आहेत.त्यामुळे टीम मॅनेजमेंटची डोकेदुखी वाढली आहे. ऑस्ट्रेलियासाठी वर्ल्ड कपआधी मजबूत फटका बसला आहे.

हे सुद्धा वाचा

ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कपआधी दक्षिण आफ्रिका दौरा करणार आहे. या दौऱ्याला 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलिया या दौऱ्यात आफ्रिका विरुद्ध टी 20 आणि वनडे सीरिज खेळणार आहे. टी 20 मालिकेत 3 सामने पार पडणार आहेत. तर वनडे सीरिजमध्ये 5 मॅच होणार आहेत. ऑस्ट्रेलियाने या दोन्ही मालिकांसाठी 7 ऑगस्टला टीम जाहीर केली

मिचेळ मार्श याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी

कॅप्टन पॅट कमिन्स याला आधीच दुखापत झाली आहे. त्यात आता स्टँड इन कॅप्टन स्टीव्हन स्मिथ आणि मिचेल स्टार्क हे दोघे बाहेर झाले आहेत. त्यामुळे आता मिचेल मार्श याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे. मिचेल मार्श टी 20 सीरिजमध्ये कॅप्टन्सी करणार होताच. त्यामुळे मार्श दोन्ही मालिकेत कर्णधार असणार आहे.आयसीसीने एक्सद्वारे (ट्विट) याबाबती माहिती दिली आहे.

पॅटला एशेज सीरिजदम्यान मनगटाला फ्रॅक्चर झालं होतं. त्यामुळे पॅट दुखापतीतून सावरतोय. तर स्टीव्हनच्या डाव्या मनगटाला दुखापत झालीय. मिचेल स्टार्कला कंबरेचा त्रास आहे. यामुळे हे तिघेही दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी उपलब्ध नसतील. दरम्यान स्टीव्हन स्मिथ याच्या जागी टी 20 टीममध्ये एश्टन टर्नर याचा समावेश करण्यात आला आहे. तर वनडे सीरिजमध्ये मार्नस लाबुशेन यांनी स्पेन्सर जॉन्सन या दोघांना स्टीव्हन स्मिथ आणि मिचेल स्टार्क यांच्या जागी संधी दिली गेली आहे.

आफ्रिका विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया टीम | मिचेल मार्श (कॅप्टन), शॉन अॅबॉट, जेसन बेहरनडॉर्फ, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, आरोन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, ग्लेन मॅक्सवेल, मॅट शॉर्ट, मार्कस स्टॉयनिस, एश्टन टर्नर आणि एडम झॅम्पा.

वनडे सीरिजसाठी ऑस्ट्रेलिया टीम | मिचेल मार्श (कर्णधार), शॉन अॅबॉट, एश्टन अगर, अॅलेक्स कॅरी, नॅथन एलिस, कॅमरुन ग्रीन, अॅरॉन हार्डी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर आणि एडम झॅम्पा.