David Warner याचं खणखणीत शतक, सचिन तेंडुलकर याचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक

| Updated on: Sep 10, 2023 | 2:08 AM

David Warner | ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमचा दिग्गज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने सचिन तेंडुलकर याला पछाडत वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. वॉर्नरने सचिनचा शतकांचा तो रेकॉर्ड अखेर ब्रेक केल आहे.

David Warner याचं खणखणीत शतक, सचिन तेंडुलकर याचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक
Follow us on

मुंबई | आयसीसी वर्ल्ड कप 2023 आधी दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी ओपनर बॅट्समन डेव्हिड वॉर्नर याने या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऐतिहासिक कामगिरी केली आहे. वॉर्नरने आफ्रिका विरुद्ध खणखणीत शतक ठोकलंय. वॉर्नरने अवघ्या 85 बॉलमध्ये हे शतक पूर्ण केलं. वॉर्नरचं दक्षिण आफ्रिका विरुद्धचं हे पाचवं शतक ठरलं. तसेच वॉर्नरच्या वनडे करियरमधील 20 वं आणि आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील 46 वं शतक ठरलं. वॉर्नरने यासह टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

डेव्हिड वॉर्नर याचा कारनामा

डेव्हिड वॉर्नर हा ओपनर बॅट्समन म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणारा फलंदाज ठरलाय. वॉर्नरने यासह सचिनच्या 45 शतकांचा रेकॉर्ड ब्रेक केलाय. आता वॉर्नरच्या नावावर ओपनर बॅट्समन म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 46 शतकांची नोंद झाली आहे.  वॉर्नरने 93 बॉलमध्ये 12 चौकार आणि 3 खणखणीत सिक्सच्या मदतीने 106 धावांची खेळी केली. वॉर्नरने या दरम्यान 113.98 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या.

हे सुद्धा वाचा

डेव्हिड वॉर्नर याचा वर्ल्ड रेकॉर्ड

ओपनर म्हणून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकं

डेव्हिड वॉर्नर – 46.
सचिन तेंडुलकर – 45.
ख्रिस गेल – 42.
सनथ जयसूर्या – 41.

वॉर्नरच्या 6 हजार धावा

दरम्यान डेव्हिड वॉर्नर याने शतकी खेळीदरम्यान ओपनर म्हणून 6 हजार एकदिवसीय धावांचा टप्पा पार केला. वॉर्नरने अवघ्या 140 डावांमध्ये ही कामगिरी केली. वॉर्नरने 144 सामन्यांमधील 142 डावात 20 शतक आणि 27 अर्धशतकांच्या मदतीने 6 हजार 136 धावा केल्या आहेत. वॉर्नरने 45.11 च्या सरासरीने या धावा केल्या आहेत.

ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | मिचेल मार्श (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशॅग्ने, जोश इंग्लिस, अॅलेक्स केरी (विकेटकीपर), टिम डेव्हिड, आरोन हार्डी, शॉन अॅबॉट, नॅथन एलिस आणि अॅडम झॅम्पा.

दक्षिण आफ्रिका प्लेईग ईलेव्हन | टेम्बा बावुमा (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडेन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, अँडिले फेहलुक्वायो, कागिसो रबाडा, अॅनरिक नॉर्टजे आणि तबरेझ शामसी.