मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी स्वीकारली. दक्षिण अफ्रिकेने 50 षटकात 5 गडी गमवून 382 धावा केल्या. विजयासाठी बांगलादेशसमोर 383 धावांचं आव्हान ठेवलं आहे. दक्षिण अफ्रिकेच्या फलंदाजांनी बांगलादेशी गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. त्यामुळे एक विकेट घेणं किती महत्त्वाचं असतं हे दिसून येतं. कर्णधार टेम्बा बावुमाच्या जागी सध्या रीजा हेंड्रिक्स हा सामन्यात खेळत आहे. मागच्या सामन्यात त्याने जबरदस्त अर्धशतक झळकावलं होतं. पण बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात त्याला काही खास करता आलं नाही. सातव्या षटकात वेगवान गोलंदाज शोरीफुल इस्लाम याने विकेट घेतली. ही विकेट इतकी जबरदस्त पद्धतीने घेतली की त्याला सेलिब्रेशनही करण्यास रोखू शकला नाही.
डावखुरा वेगवान गोलंदाज शोरीफुल इस्लामचा याने टाकलेला चेंडू अचूक टप्प्यात पडला. इतका जबरदस्त पद्धतीने मधे घुसला की त्रिफळा उडवून गेला. त्याला हा चेंडू कळला नाहीत. यानंतर शोरीफुल याला वेगळाच आनंद झाला. बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन याची फेमस स्टेप केली. ऋतिक रोशन याने वर्ष 2000 साली कहो ना प्यार चित्रपटात ‘एक पल का जीना’ या गाण्यात ही स्टेप केली होती.
दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करताना बांगलादेश डाव अडखळला. 50 धावांच्या आतच 4 गडी बाद झाले. त्यामुळे बांगलादेशवर पराभवाचं सावट आहे. बांगलादेशने हा सामना गमावल्यातच जमा आहे. त्यामुळे पराभवावर शिक्कामोर्तब होताच स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे.
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा, लिझाद विल्यम्स.
बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): तनझिद हसन, लिटन दास, नजमुल हुसेन शांतो, शकीब अल हसन (कर्णधार), मेहदी हसन मिराझ, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमुदुल्लाह, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान, शोरीफुल इस्लाम, हसन महमूद.