आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 21 व्या सामन्यात डी ग्रुपमधील दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश आमनेसामने आहेत. या सामन्याला रात्री 8 वाजता नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. एडम मारक्रम दक्षिण आफ्रिकचं नेतृत्व करणार आहे. तर नजमुल हुसैन शांतो याच्याकडे बांगलादेशच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघ या स्पर्धेत अद्याप अजिंक्य आहेत. त्यामुळे या सामन्यात दोघांपैकी एकाची विजयी घोडदौड थांबणार आहे.
बांगलादेशने सलामीच्या सामन्यात श्रीलंकेवर 8 जून रोजी 2 विकेट्सने विजय मिळवला. तर दक्षिण आफ्रिकने श्रीलंका आणि नेदरलँड्सचा पराभव केलाय. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला बांगलादेशवर मात करत विजयाची हॅट्रिक करण्याची संधी आहे. इतकंच नाही, तर दक्षिण आफ्रिका या विजयासह डी ग्रुपमधून सुपर 8 साठी दावा निश्चित करु शकते. दक्षिण आफ्रिका 4 गुणांसह पहिल्या आणि बांगलादेश 2 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. त्यानंतर तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या स्थानी अनुक्रमे नेदरलँड्स, नेपाळ आणि श्रीलंका आहेत. नेदरलँड्सने 2 पैकी 1 सामना जिंकला आहे. तर श्रीलंका आणि नेपाळ या दोन्ही आशियाई संघाना पहिल्या विजयाची प्रतिक्षा आहे.
दरम्यान बांगलादेशचा दक्षिण आफ्रिके विरुद्ध विजय मिळवून सुपर 8 च्या शर्यतीत कायम राहण्याचा प्रयत्न असणार आहे. दक्षिण आफ्रिका विजय मिळवत सुपर 8 मधील स्वत:चं स्थान सुरक्षित करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. आता या दोघांपैकी कोणत्या संघाच्या प्रयत्नांना यश मिळतं, हे सामन्याच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.
दक्षिण आफ्रिका-बांगलादेश आमनेसामने
ICC Men’s T20 World Cup
Bangladesh 🆚 South Africa | 10 June, 2024 | Time: 08:30 PM (BST)
Venue: Nassau County International Cricket Stadium, New YorkPhoto Credit: ICC/Getty#BCB #Cricket #BANvSA #T20WorldCup pic.twitter.com/q9fOkogMKy
— Bangladesh Cricket (@BCBtigers) June 9, 2024
दक्षिण आफ्रिका टीम: एडन मारक्रम (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जानसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरिख नॉर्खिया, ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, रायन रिकेल्टन, ब्योर्न फॉर्च्युइन आणि तबरेझ शम्सी.
बांगलादेश क्रिकेट टीम: नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), लिटॉन दास (विकेटकीपर), तांझिद हसन, सौम्या सरकार, तॉहीद हृदोय, शाकिब अल हसन, महमुदुल्लाह, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तन्झिम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान, महेदी हसन, तन्वीर इस्लाम, शोरीफुल इस्लाम आणि जाकर अली.