मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 23 व्या सामन्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश आमनेसामने असणार आहे. दक्षिण आफ्रिका या स्पर्धेत आतापर्यंत जोरात आहे. दक्षिण आफ्रिकेने 4 पैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेचा इतर संघांच्या तुलनेत सर्वात चांगला नेट रन रेट आहे. तर दुसऱ्या बाजूला बांगलादेशने 4 पैकी फक्त 1 सामन्यातच विजय मिळवला आहे. त्यामुळे बांगलादेशला वर्ल्ड कपमधील आव्हान कायम राखण्यासाठी आफ्रिका विरुद्ध विजय मिळवावा लागेल. त्यामुळे हा सामन्यात चढाओढ पाहायला मिळण्याची शक्यता आहे. हा सामना कधी, कुठे होणार, टीव्ही-मोबाईलवर कुठे पाहता येणार, हे जाणून घेऊयात.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश यांच्यातील सामना हा मंगळवारी 24 ऑक्टोबर रोजी खेळवण्यात येणार आहे.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होईल. तर 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश मॅच टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश मॅच मोबाईलवर डिज्नी प्लस हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
बांगलादेश टीम | शकिब अल हसन (कॅप्टन), लिटॉन कुमेर दास, तन्झिद हसन तमीम, नजमुल हुसेन शांतो (विकेटकीपर), तौहीद हृदोय, मुशफिकुर रहीम, महमुदुल्लाह रियाद, मेहिदी हसन मिराझ, नसुम अहमद, शाक महेदी हसन, तस्किन रहमान, मुस्तफीर रहमान , हसन महमूद , शोरीफुल इस्लाम आणि तनझिम हसन साकीब.
दक्षिण आफ्रिका टीम | टेम्बा बावुमा (कॅप्टन), गेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अँडिले फेहलुक्वायो, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी, रॅसी ड्युसेन, विल्यम ड्युसेन आणि लीडर वॅन्सी.