जोहान्सबर्ग | दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील टी 20 मालिका 1-1 ने बरोबरीत राहिली. त्यानंतर आता उभयसंघात आज 17 डिसेंबरपासून एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील पहिला सामना हा जोहान्सबर्गमधील वांडरर्स स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 1 वाजता टॉस झाला. दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला. कॅप्टन एडन मारक्रम याने बॅटिंगचा निर्णय घेतला. या सामन्यातून टीम इंडियाकडून एका युवा खेळाडू पदार्पण करत असल्याची माहिती टीम इंडियाचा कॅप्टन केएल राहुल याने टॉस वेळेस दिली. तो खेळाडू कोण आहे, हे आपण जाणून घेऊयात.
साई सुदर्शन याने दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या पहिल्या वनडेतून डेब्यू केलं आहे. टीम इंडियाचा कॅप्टन केएल राहुल याने टॉसआधी हडल टॉकमध्ये साईला कॅप देत टीम इंडियात स्वागत केलं. तसेच यावेळेस इतर खेळाडूंनी साईला अभिनंदन करत त्याला क्रिकेट कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. साई सुदर्शनचं हे आंतरराष्ट्रीय पदार्पण ठरलंय. साईचं पदार्पणानंतर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. साईचं पदार्पण सुदर्शन कुटुंबियांसाठी अभिमास्पद आणि अविस्मरणीय असा क्षण होता.
“साईच्या पदार्पणानंतर त्याने प्रतिक्रिया दिली. आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणं स्वप्न असतं. हा माझ्यासाठी भावनिक क्षण आहे. घराच्यांसह सराव केल्याचा मला फायदा झाला”, अशी प्रतिक्रिया साईने दिली. साईला घरातूनच खेळाडू बाळकडू मिळालं. साई त्याच्या आई-वडिलांसह सराव करायचा, याचाच फायदा साईला झाला.
साईचा टीम इंडियापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. त्याने याआधी आयपीएल, इतर क्रिकेट स्पर्धांमध्ये आणि एमर्जिंग आशिया कप स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केलीय. साईने आयपीएलच्या 16 व्या हंगामातील अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सकडून 96 धावा केल्या. तसेच एमर्जिंग आशिया कप स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध शतक ठोकलं होतं. त्यामुळे आता साईकडून क्रिकेट चाहत्यांना अशाच वादळी आणि स्फोटक खेळीची अपेक्षा असणार आहे.
साईचं आंतरराष्ट्रीय पदार्पण
📸 📸 That Moment when @sais_1509 received his #TeamIndia cap 🧢 from captain @klrahul! 👏 👏
A moment to cherish for the youngster! 👌 👌
Go well! 👍 👍#SAvIND pic.twitter.com/opR6AP9h7Z
— BCCI (@BCCI) December 17, 2023
दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | एडन मार्करम (कॅप्टन), रीझा हेंड्रिक्स, टोनी डी झोर्झी, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, अँडिले फेहलुकवायो, केशव महाराज, नांद्रे बर्गर आणि तबरेझ शम्सी.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, संजू सॅमसन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान, कुलदीप यादव आणि मुकेश कुमार.