डरबन | दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पहिल्या टी 20 सामन्याचं आयोजन हे डरबनमध्ये करण्यात आलं आहे. टीम इंडियाचं नेतृत्व हे सूर्यकुमार यादव याच्याकडे आहे. तर एडन मारक्रम दक्षिण आफ्रिकेचं कर्णधारपद सांभाळणार आहे. सामन्याला नियोजित वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजून 30 वाजता सुरुवात होणं अपेक्षित होतं. तर 7 वाजता टॉस होणार होता. मात्र डरबनमध्ये अंदाजानुसार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे टॉसला विलंब झाला आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांची टॉससाठीची प्रतिक्षा वाढली आहे. आता क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे पाऊस केव्हा थांबतोय याकडे लागून राहिलं आहे.
हवामान खात्याने सामन्याच्या काही तासांआधीच डरबन आणि स्टेडियम परिसरात पावासाची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र क्रिकेट चाहते हे उत्सुकतेने सामन्याचा आनंद लुटण्यासाठी मैदानात हजर राहिले. टॉसच्या आधीच पावसाने तुफान बॅटिंग करायला सुरुवात केलेली. मैदान कव्हर्सने झाकून ठेवलेले. संध्याकाळी 7 वाजले. आता क्रिकेट चाहत्यांचं टॉसकडे लक्ष लागून राहिलं होतं. मात्र टॉसला पावसामुळे विलंब होणार असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे आता पुढील अपडेट किती वाजता येते आणि टॉस होतो, याची प्रतिक्षा क्रिकेट चाहत्यांना असणार आहे.
पावसामुळे खेळखंडोबा
The first #SAvIND T20I has been delayed due to rain 🌧
📝: https://t.co/htLhGtrKoi pic.twitter.com/eNQSKMW9PY
— ICC (@ICC) December 10, 2023
दक्षिण आफ्रिका 20 टीम | एडेन मार्करम (कर्णधार), बार्टमॅन, मॅथ्यू ब्रीटक्जे, नांद्रे बर्गर, डोनोवॅन फरेरिया, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, डेविड मिलर, एंडिले फेहलुकवायो, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, लिजाड विलियम्स, गेराल्ड कोएत्झी, मार्को जानेसन आणि लुंगी एन्गिडी. (शेवटच्या तिघांना पहिल्या 2 सामन्यांसाठी संधी)
टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया | सूर्यकुमार यादव (कॅप्टन), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि दीपक चाहर.