टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील 4 सामन्यांच्या टी 20I मालिकेला आज 8 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. भारताच्या या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यातील सलामीचा सामना हा किंग्समीड, डर्बन येथे आयोजित करण्यात आला आहे. सूर्यकुमार यादव टीम इंडियाचं नेतृत्व करत आहे. तर एडन मार्करम याच्या खांद्यावर दक्षिण आफ्रिकेच्या कॅप्टन्सीची जबाबदारी आहे. या पहिल्या सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 8 वाजता टॉस झाला. दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला. कॅप्टन एडन मार्करम याने फिल्डिंगचा निर्णय घेत भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.
इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 27 टी 20 सामने झाले आहेत. टीम इंडियाने या 27 पैकी सर्वाधिक 15 सामने जिंकले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेने 11 वेळा विजय मिळवला आहे. तर उभयसंघात 2022 पासून 12 टी 20I सामने झाले आहेत. भारताने या 12 पैकी 6 सामने जिंकलेत. तर दक्षिण आफ्रिकेने 5 वेळा भारतावर मात केली आहे. तसेच टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेतही यशस्वी राहिली आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेत खेळलेल्या 9 पैकी 6 सामने जिंकले आहेत. तर यजमानांना 3 सामन्यातच यश मिळलता आलं आहे.
दरम्यान टीम इंडियाकडून या सामन्यात विजयकुमार वैशाख आणि रमनदीप सिंह या दोघांना किंवा दौघांपैकी एकाला पदार्पणाची संधी मिळेल, अशी शक्यता होती. मात्र सलामीच्या सामन्यासाठी भारताकडून कुणाचंही पदार्पण झालेलं नाही. तर दक्षिण आफ्रिकेने एकाला पदार्पणाची संधी दिली आहे. यजमानांनी 21 वर्षीय अँडीले सिमेलेन याला डेब्यू करण्याची संधी दिली आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने नाणेफेकीचा कौल
🚨 Toss Update 🚨
South Africa win the toss in the 1st T20I and elect to field.
Live – https://t.co/0OuHPYbn9U#TeamIndia | #SAvIND pic.twitter.com/6IuUahZ7pB
— BCCI (@BCCI) November 8, 2024
दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन : एडन मार्करम (कर्णधार), रायन रिकेल्टन (विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, पॅट्रिक क्रुगर, मार्को जॅन्सन, अँडीले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज आणि न्काबायोमझी पीटर.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग आणि आवेश खान.