दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी 20I सामन्यात टीम इंडियाला पराभूत व्हावं लागलं. भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 125 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र वरुण चक्रवर्थी याने 5 विकेट्स घेऊन दक्षिण आफ्रिकेची हवा टाईट केली होती. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला बॅक फुटवर टाकत जवळपास सामना जिंकेललाच. मात्र कॅप्टन सूर्यकुमार यादव याने निर्णायक क्षणी फिरकी गोलंदाजांना विकेट्स मिळत असताना पेसर्सवर विश्वास दाखवला. इथेच सामना फिरला. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी वेगवान गोलंदाजांसमोर धावा केल्या आणि 3 विकेट्सने विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने 19 ओव्हर मध्ये 7 विकेट्स गमावून 128 धावा केल्या आणि 4 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. सूर्याने या पराभवानंतर अप्रत्यक्ष फलंदाजांना कारणीभूत ठरवलं.
“तुम्ही केलेल्या धावांचा बचाव करायला हवा. मात्र प्रतिस्पर्धी संघाला विजयी आव्हान म्हणून 125 किंवा 140 धावा देणं हे तुम्हाला पटणारं नसतं. मात्र त्यानंतरही मी गोलंदाजांच्या कामगिरीवर आनंदी आहे ज्यांनी या सामन्यात जीव ओतला आणि रंगत आणली”, असं सूर्या म्हणाला. तसेच सूर्याने वरुण चक्रवर्ती यांचं कौतुक केलं.
“एका टी 20 सामन्यात 5 विकेट्स घेणं तेही अशा स्थितीत ही मोठी बाब आहे. वरुणने त्याच्या खेळात बदल केले आहेत. त्याच्या कठोर परिश्रमाची प्रचित आपण पाहतोय. मालिकेतील 2 सामने बाकी आहेत. क्रिकेट चाहत्यांना या सामन्यांमध्ये रंगत पाहायला मिळेल अशी मला आशा आहे”, असंही सूर्याने सामन्यानंतर म्हटलं.
सूर्याचा अप्रत्यक्ष फलंदाजांवर निशाणा
Suryakumar Yadav after the match:#SuryakumarYadav #TeamIndia #IndianCricketteam #BCCI #INDvSA #SAvIND pic.twitter.com/VWhE6s5I6r
— Khel Cricket (@Khelnowcricket) November 10, 2024
दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन : एडन मार्करम (कर्णधार), रायन रिकेल्टन, रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, अँडीले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज आणि न्काबायोमझी पीटर
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती आणि आवेश खान.