ग्वेबेऱ्हा | दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीमने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियावर 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 212 धावांचं आव्हान दिलं होतं. दक्षिण आफ्रिकेने हे आव्हान 2 विकेट्स गमावून 42.3 ओव्हरमध्ये आरामात पूर्ण केलं. दक्षिण आफ्रिकेकडून टोनी डी झोर्झी याने सर्वाधिक धावा केल्या. टोनी डी झोर्झीने नाबाद 119 धावांची खेळी केली. तर रिझा हेंड्रिक्स याने अर्धशतकी खेळी करत विजयात योगदान दिलं. दक्षिण आफ्रिकेने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली.
दक्षिण आफ्रिकेची बॅटिंग
टोनी डी झोर्झीने आणि रिझा हेंड्रिक्स या सलामी जोडीने 130 धावांची सलामी भागीदारी करत दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा पाया रचला. त्यानंतर रिझा हेंड्रिक्स 81 बॉलमध्ये 52 धावा करुन आऊट झाला. त्यानंतर टोनी डी झोर्झीने आणि रॅसी व्हॅन डर ड्युसेन या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 76 धावा जोडल्या. रॅसी व्हॅन डर ड्युसेन याला डेब्युटंट रिंकू सिंह याने विकेटकीपर संजू सॅमसन याच्या हाती कॅच आऊट केलं. रॅसी व्हॅन डर ड्युसेन याने 51 बॉलमध्ये 36 धावा केल्या.
टोनी डी झोर्झीने आणि कॅप्टन एडन मारक्रम या जोडीने दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून दिला. एडन 2 धावांवर नाबाद राहिला. तर टोनी डी झोर्झीने याने 122 चेंडूत 9 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने नाबाद 119 धावा केल्या. टोनी डी झोर्झीने याचं हे पहिलंवहिलं शतक ठरलं. तर टीम इंडियाकडून रिंकू सिंह आणि अर्शदीप सिंह या दोघांना 1-1 विकेट मिळाली.
मालिका 1-1 ने बरोबरीत
A comprehensive win for the Proteas as they level the series in Gqeberha 💪#SAvIND 📝: https://t.co/wOy7UylrlP pic.twitter.com/8axFAToAut
— ICC (@ICC) December 19, 2023
त्याआधी टीम इंडियाने कॅप्टन केएल राहुल आणि साई सुदर्शन या दोघांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ऑलआऊट 211 धावा केल्या. केएलने 56 आणि साईने 62 धावा केल्या. या दोघांशिवाय इतरांना विशेष योगदान देता आलं नाही. दरम्यान या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना हा 21 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. हा सामना जिंकणारा संघ मालिका जिंकेल. त्यामुळे निश्चितच तिसऱ्या सामन्यात चांगलीच चढाओढ पाहायला मिळेल.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | केएल राहुल(कॅप्टन आणि विकेटकीपर), रुतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान, कुलदीप यादव, मुकेश कुमार
दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | एडन मारक्रम (कॅप्टन), टोनी डी झोर्झी, रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, केशव महाराज, नांद्रे बर्गर, लिझाद विल्यम्स आणि ब्यूरन हेंड्रिक्स.