ग्वेबेऱ्हा | दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या पहिल्या वनडेतून पदार्पण करणाऱ्या साई सुदर्शन याने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात धमाका केलाय. साईने दक्षिण आफ्रिके विरुद्ध सलग दुसरं अर्धशतक ठोकत टीम इंडियाच्या दिग्गजाच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. साई सुदर्शन अशी कामगिरी करणारा एकूण दुसरा भारतीय ठरला आहे. साईने नक्की टीम इंडियाच्या कोणत्या दिग्गजाच्या विक्रमाची बरोबरी केली आहे, हे आपण जाणून घेऊयात.
साईने 20 व्या ओव्हरमध्ये विआन मुल्डर याच्या बॉलिंगवर एक रन घेत अर्धशतक पूर्ण केलं. साईला अर्धशतक पूर्ण करण्यासाठी 65 चेंडूंचा सामना करावा लागला. साईने 76.92 च्या स्ट्राईक रेटने आणि 1 सिक्स-6 चौकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केलं. साई सुदर्शन यासह नवज्योत सिंह सिद्धू यांच्यानंतर अशी कामगिरी करणरा दुसरा भारतीय फलंदाज ठरला.
साईने आपल्या पहिल्याच वनडेत दक्षिण आफ्रिके विरुद्ध नाबाद 55 धावांची खेळी केली होती. तर आता त्याने अर्धशतक केलंय. त्याआधी नवज्योत सिंह सिद्धू यांनी पहिल्या 2 वनडे सामन्यांमध्ये असा कारनामा केला होता. सिद्धू यांनी 1987 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध 73 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध 75 धावा केल्या होत्या.
दरम्यान साई अर्धशतकानंतर संयमाने खेळत होता.त्याने 60 पार मजल मारली. साई ज्या पद्धतीने खेळत होता, त्या पद्धतीने तो दुसऱ्या सामन्यात शतक झळकावेल, अशी दाट शक्यता होती. पण तसं होऊ शकलं नाही. लिझाद विल्यम्स याने 27 व्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर साईला हेनरिक क्लासेन याच्या हाती कॅच आऊट केलं. साई 83 बॉलमध्ये 7 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने 62 धावा करुन आऊट झाला.
साईची अर्धशतकी खेळी
Back to back half-centuries for Sai Sudharsan.
What a dream start for the youngster 👏👏
Live – https://t.co/p5r3iTcPrj #SAvIND pic.twitter.com/EVCxtUILpZ
— BCCI (@BCCI) December 19, 2023
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | केएल राहुल(कॅप्टन आणि विकेटकीपर), रुतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान, कुलदीप यादव, मुकेश कुमार
दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | एडन मारक्रम (कॅप्टन), टोनी डी झोर्झी, रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, केशव महाराज, नांद्रे बर्गर, लिझाद विल्यम्स आणि ब्यूरन हेंड्रिक्स.