ग्वेबेऱ्हा | दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना हा 19 नोव्हेंबरला ग्वेबेऱ्हा येथील सेंट जॉर्जस पार्क येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला आता थोड्याच वेळात दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 4 वाजता टॉस करण्यात आला. दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला. कॅप्टन एडन मारक्रम याने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. त्यामुळे टीम इंडिया पहिली बॅटिंग करणार आहे. टीम इंडियात एकमेव पण मोठा बदल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या बाजूला दक्षिण आफ्रिकेने प्लेईंग ईलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत.
टीम इंडिया या वनडे सीरिजनंतर दक्षिण आफ्रिके विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. श्रेयस अय्यर याला या कसोटी मालिकेच्या तयारीसाठी परवानगी मिळाली आहे. त्यामुळे श्रेयस अय्यर वनडे सीरिजमधून बाहेर पडला आहे. त्यामुळे श्रेयसच्या जागी टीम इंडियाच्या युवा फलंदाजाला संधी मिळाली आहे. रिंकू सिंह याचं वनडे डेब्यू ठरलं आहे. रिंकूने याआधी आयर्लंड विरुद्ध टी 20 डेब्यू केलंय.
टीम इंडिया या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला मालिकेतील आव्हान कायम राखण्यााठी दुसरा सामना हा करो या मरो असा आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिका या सामन्यात ताकदीने उतरली आहे. दक्षिण आफ्रिकेने या सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत. ब्युरन हेंड्रिक्स आणि लिझाद विल्यम्स या दोघांना प्लेईंग ईलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलं आहे.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया आमनेसामने
Hello from Gqeberha for the 2⃣nd #SAvIND ODI 👋#TeamIndia pic.twitter.com/fGsF2SV29G
— BCCI (@BCCI) December 19, 2023
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | केएल राहुल(कॅप्टन आणि विकेटकीपर), रुतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान, कुलदीप यादव, मुकेश कुमार
दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | एडन मारक्रम (कॅप्टन), टोनी डी झोर्झी, रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, केशव महाराज, नांद्रे बर्गर, लिझाद विल्यम्स आणि ब्यूरन हेंड्रिक्स.