ग्वेबेऱ्हा | दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसऱ्या टी 20 सामन्याचं आयोजन हे ग्वेबेऱ्हा येथील सेंट जॉर्ज पार्क येथे करण्यात आलं आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 8 वाजता टॉस उडवण्यात आला. दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला. कॅप्टन एडन मारक्रम याने पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टीम इंडियाला पहिले बॅटिंग करावी लागणार आहे.
दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या या दुसऱ्या सामन्यातून टीम इंडियाच्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये ओपनर शुबमन गिल याचं कमबॅक झालं आहे. वर्ल्ड कपनंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेचं आयोजन करण्यात आलं होतं. या मालिकेतून मुख्य खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. यामध्ये शुबमन गिल यालाही विश्रांती देण्यात आली होती. आता शुबमनची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे शुबमनकडून चांगल्या खेळीची अपेक्षा असणार आहे.
दरम्यान टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 25 टी 20 सामने झाले आहेत. टीम इंडिया या 25 सामन्यांमध्ये वरचढ राहिली आहे. टीम इंडियाने 25 पैकी 13 सामने टीम इंडियाने जिंकले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेने 10 सामने जिंकलेत. तर 1 सामन्यांचा निकाल लागू शकला नाही. तर याच मालिकेतील पहिला सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला.
तसेच दक्षिण आफ्रिकेत टीम इंडियाने एकूण 7 टी 20 सामने खेळले आहेत. या 7 पैकी 5 सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवलाय. तर दक्षिण आफ्रिकेला 2 वेळा यश आलंय. या आकडेवारीवरुन हेच स्पष्ट होतं की टीम इंडियाचा रेकॉर्ड दक्षिण आफ्रिकेत चांगला रेकॉर्ड आहे.
दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला
🚨 Toss Update 🚨
South Africa have elected to bowl against #TeamIndia in the second #SAvIND T20I.
Follow the Match 👉 https://t.co/4DtSrebAgI pic.twitter.com/4UFl7rCNLF
— BCCI (@BCCI) December 12, 2023
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह आणि मुकेश कुमार.
दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | एडेन मारक्रम (कॅप्टन), मॅथ्यू ब्रीट्जके, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेविड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जानसन, एंडिले फेहलुकवायो, गेराल्ड कोएत्जी, लिजाद विलियम्स आणि तबरेज शम्सी.