SA vs IND | एडन मारक्रम याच्या नावावर 2024 मधील पहिलं कसोटी शतक, टीम इंडिया विरुद्ध चिवट खेळी

| Updated on: Jan 04, 2024 | 4:25 PM

South Africa vs India 2nd Test Day 2 | एडन मारक्रम याने दक्षिण आफ्रिका अडचणीत असताना झुंजार खेळी करत शतक ठोकलं. एडनच्या या खेळीमुळेच दक्षिण आफ्रिकेला 100 पार मजल मारता आली.

SA vs IND | एडन मारक्रम याच्या नावावर 2024 मधील पहिलं कसोटी शतक, टीम इंडिया विरुद्ध चिवट खेळी
Follow us on

केप टाऊन | दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीमचा सलामीवीर एडन मारक्रम याने 2024 या वर्षातील पहिलं कसोटी शतक ठोकण्याचा बहुमान मिळवला आहे. एडनने न्यूलँड्स केप टाऊन येथे टीम इंडिया विरुद्धच्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिका अडचणीत असताना हे शतक लगावलंय. एडनने बॅटिंगसाठी आव्हानात्मक असलेल्या खेळपट्टीवर ही कामगिरी करुन दाखवलीय. एडनने यासह टीम इंडियाची डोकेदुखी आणखी वाढवलीय. एडनच्या या शतकामुळे दक्षिण आफ्रिकेला आघाडी घेण्यात यश आलंय.

एडन मारक्रम याने वनडे स्टाईल शतक केलं. एडनने अवघ्या 99 बॉलमध्ये 16 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने हे शतक पूर्ण केलं. एडनच्या कसोटी कारकीर्दीतील हे 7 वं शतक ठरलं. मात्र शतकानंतर एडन फार वेळ मैदानात राहू शकला नाही. मोहम्मद सिराज याने एडनला रोहित शर्मा याच्या हाती कॅच आऊट केलं. एडन 103 बॉलमध्ये 106 धावा करुन माघारी परतला. मात्र तोवर दक्षिण आफ्रिकेने 60 धावांची आघाडी घेतली. ही आघाडी या खेळपट्टीवर फार निर्णायक अशी आहे. कारण, दक्षिण आफ्रिका पहिल्या डावात 55 आणि टीम इंडिया 153 धावांवर ऑलआऊट झाली. त्यामुळे टीम इंडियाला पहिल्या डावात 98 धावांची आघाडी मिळाली.

केएलकडून एडनला शतकासाठी मदत

दरम्यान टीम इंडियाचा विकेटकीपर एडन मारक्रम याला शतक ठोकण्यास मदत केली, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण, केएलने एडन मारक्रम याची कॅच सोडली. एडन तेव्हा 74 धावांवर खेळत होता. जसप्रीत बुमराहच्या बॉलिंगवर केएलने ही संधी सोडली. केएलने ही कॅच घेतली असती तर दक्षिण आफ्रिकेला 60 पेक्षा अधिक धावांचीही आघाडी घेता आली नसती.

एडन मारक्रमचं शतक

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा आणि मुकेश कुमार

दक्षिण आफ्रिका प्लेईंग इलेव्हन | डीन एल्गर (कॅप्टन), एडन मारक्रम, टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकटेकीपर), मार्को जान्सेन, केशव महाराज, कगिसो रबाडा, नांद्रे बर्गर आणि लुंगी एनगिडी.