केपटाऊन | टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील टेस्ट सीरिजमधील दुसरा आणि अंतिम सामना 3 जानेवारीपासून सुरु होणार आहे. हा सामना केपटाऊनमधील न्यू लँड्समध्ये आयोजित करण्यात आला आहे. न्यू दक्षिण आफ्रिकेने पहिला सामना जिंकून मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. त्यामुळे आता टीम इंडियाचा प्रयत्न 1-1 असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला दक्षिण आफ्रिका दुसरा सामना जिंकत टीम इंडियाचा धुव्वा उडवण्याच्या तयारीत असणार आहे. टीम इंडियाला व्हाईट वॉश टाळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला कडवी झुंज द्यावी लागणार आहे. या सामन्यानिमित्ताने उभयसंघातील आकडेवारी आपण जाणून घेऊयात.
टीम इंडियाला आतापर्यंत केपटाऊनमध्ये एकही कसोटी सामना जिंकता आलेला नाही. टीम इंडियाने केपटाऊमध्ये 1993 पासून आतापर्यंत या मैदानात 6 कसोटी सामने खेळले आहेत. टीम इंडियाचा या 6 पैकी 4 पराभव झाला आहे. तर टीम इंडियाला 2 सामने अनिर्णित राखण्यात यश आलं आहे. टीम इंडियाने या मैदानात अखेरचा सामना 2 वर्षांपूर्वी जानेवारी 2022 मध्ये खेळला होता. तेव्हा टीम इंडियाला 7 विकेट्सने पराभूत व्हावं लागलं होतं.
दरम्यान टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात एकूण 43 कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये काही प्रमाणात दक्षिण आफ्रिका सरस ठरली आहे. दक्षिण आफ्रिकेने 43 पैकी 18 सामने जिंकले आहेत. तर टीम इंडियाला 15 सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर 10 सामने अनिर्णित राहिले आहेत.
टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अभिमन्यु ईश्वरन, रवीचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), शार्दूल ठाकुर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह, आवेश खान आणि प्रसिद्ध कृष्णा.
दक्षिण आफ्रिका टीम | टेम्बा बावुमा (कर्णधार), डेविड बेडिंघम, नांद्रे बर्गर, एडेन मार्करम, वियान मुल्डर, कगिसो रबाडा, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरेन, गेराल्ड कोएट्जी, टोनी डी जोर्जी, डीन एल्गर, मार्को यानसेन, केशव महाराज, लुंगी एनगिडी आणि कीगन पीटरसन.