केपटाऊन | टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या कसोटी सामन्यात अवघ्या 55 धावांवर गुंडाळलं. टॉस जिंकून मोठ्या विश्वासाने बॅटिंगसाठी मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेचा टीम इंडियाच्या गोलंदाजांनी खुर्दा उडवला. मोहम्मद सिराजचा भेदक मारा आणि इतरांनीही दिलेल्या साथीच्या जोरावर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा कार्यक्रम केला. मोहम्मद सिराजने 6 विकेट्स घेत कसोटी कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली. तर मुकेश कुमार आणि जसप्रीत बुमराह या दोघांनी 2-2 विकेट घेत धमाका केला. बुमराहने या 2 विकेट्ससह रेकॉर्ड ब्रेक केला. तसेच एका विक्रमाची बरोबरी केली.
उभयसंघातील दुसरा कसोटी सामना हा दक्षिण आफ्रिकेतील न्यूलँड्स येथे खेळवण्यात येत आहे. बुमराहने दुसरी विकेट घेत अनिल कुंबळेला मागे टाकलंय. सोबतच या मैदानात सर्वाधिक विकेट्स घेणारा संयुक्तरित्या पहिला गोलंदाज ठरलाय. आता बुमराह 1 विकेट घेताच या मैदानात सर्वाधिक विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरेल.
बुमराहला या सामन्याआधी अनिल कुंबळेचा रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी 2 विकेट्सची गरज होती. बुमराहने नांद्रे बर्गर याला आऊट करत कुंबळेचा रेकॉर्ड ब्रेक केला. यासह बुमराहच्या नावावर आता या मैदानात 3 सामन्यांमधील 5 डावांमध्ये 12 विकेट्सची नोंद झाली आहे. तसेच या मैदानात भारतीय म्हणून सर्वाधिक विकेट्सचा विक्रम जवागल श्रीनाथ याच्या नावे आहे. जवागल श्रीनाथने 2 सामन्यात 12 विकेट्स घेतल्या आहेत, या विक्रमाची बुमराहने बरोबरी केलीय. त्यामुळे आता बुमराह आणखी 1 विकेट घेताच न्यूलँड्समध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरेल.
बुमराहच्या दक्षिण आफ्रिके विरुद्ध 2 विकेट्स
Jasprit Bumrah with his second wicket and a sharp catch by Yashasvi Jaiswal in the slips.
South Africa 9 down for 55 runs.
Live – https://t.co/j9tTnGLuBP #SAvIND pic.twitter.com/3ED60VCXfU
— BCCI (@BCCI) January 3, 2024
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा आणि मुकेश कुमार
दक्षिण आफ्रिका प्लेईंग इलेव्हन | डीन एल्गर (कॅप्टन), एडन मारक्रम, टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकटेकीपर), मार्को जान्सेन, केशव महाराज, कगिसो रबाडा, नांद्रे बर्गर आणि लुंगी एनगिडी.