केप टाऊन | टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात टीम इंडिया टी 20, वनडेनंतर आता कसोटी मालिका खेळत आहे. उभयसंघात पहिला कसोटी सामना हा 26 ते 30 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला होता. दक्षिण आफ्रिकेने हा सामना चौथ्या दिवशीच डाव आणि 32 धावांनी जिंकला. दक्षिण आफ्रिकेने या विजयासह 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. त्यामुळे टीम इंडियासाठी दुसरा कसोटी सामना हा करा किंवा मरा असा आहे. या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह याला मोठा विक्रम करण्याची संधी आहे.
बुमराहने पहिल्या कसोटीत 4 विकेट्स घेतल्या. तर केप टाऊनमध्ये होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मोठा कारनामा करण्यापासून बुमराह 2 पाउल दूर आहे. बुमराहला टीम इंडियाचा नंबर 1 बॉलर होण्याची संधी आहे. बुमराह 3 विकेट्स घेताच इतिहास रचेल. बुमराह 3 विकेट्स घेताच या मैदानात सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज ठरेल.
बुमराहने आतापर्यंत केप टाऊनमधील न्यूलँड्समध्ये 2 सामने खेळले आहेत. बुमराहने या 2 सामन्यात 10 विकेट्स घेतल्या आहेत. तर अनिल कुंबळने याच मैदानात 3 सामन्यात 11 आणि जवागल श्रीनाथ याने 2 सामन्यात 12 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे आता बुमराह अनिल कुंबळेसह जवागल श्रीनाथचा विक्रम मोडीत काढतो का, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
दुसऱ्या कसोटीआधी बीसीसीआयकडून फोटो शेअर
A stunning view here at the Newlands Cricket Ground as #TeamIndia prepare for the 2nd Test match.#SAvIND pic.twitter.com/4NmEMp61Hv
— BCCI (@BCCI) January 1, 2024
दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अभिमन्यु ईश्वरन, रवीचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, के.एल.राहुल (विकेटकीपर), के.एस.भरत (विकेटकीपर), शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा.
दक्षिण आफ्रिका टीम | टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी जोर्जी, डेविड बेडिंघम, डीन एल्गर, मार्को यानसेन, एडन मार्करम, वियान मुल्डर, कगिसो ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरेन, गेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, लुंगी एन्गिडी, कगिसो रबाडा, कीगन पीटरसन आणि नांद्रे बर्गर.