केप टाऊन | टीम इंडियाने दुसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्याच दिवशी दक्षिण आफ्रिकेवर 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला विजयासाठी अवघ्या 79 धावाचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. टीम इंडियाने 12 ओव्हरमध्ये 80 धावा केल्या. टीम इंडियाने या विजयासह 2 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने मालिका बरोबरीत सोडवली आहे. टीम इंडियाने अशाप्रकारे दक्षिण आफ्रिका दौऱ्याचा शेवट हा विजयाने केला आहे.
टीम इंडियाकडून दुसऱ्या डावात ओपनर यशस्वी जयस्वाल याने सर्वाधिक 28 धावा केल्या. शुबमन गिल याने 10 आणि विराट कोहली याने 12 धावा केल्या. तर कॅप्टन रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर या जोडीने टीम इंडियाला विजय मिळवून दिला. श्रेयस अय्यर याने चौकार ठोकत टीम इंडियाला विजयश्री मिळवून दिली.श्रेयसने नाबाद 4 धावा केल्या. तर रोहित शर्मा 17 रन्सवर नॉट आऊट परतला. दक्षिण आफ्रिकेकडून कगिसो रबाडा, नांद्रे बर्गर आणि मार्को जान्सेन या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात 55 धावांवर ऑलआऊट केलं. यामध्ये मोहम्मद सिराजने मोठी भूमिका बजावली. सिराजने 6 विकेट्स घेतल्या. त्यानंतर टीम इंडियाने पहिल्या डावात ऑलआऊट 153 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाला 98 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने एडन मारक्रम याच्या शतकाच्या जोरावर ऑलआऊट 176 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाला 79 धावांचं आव्हान मिळालं. टीम इंडियाने हे आव्हान सहज पूर्ण केलं.
टीम इंडियाचा न्यूलँड्समध्ये ऐतिहासिक विजय
𝘼 𝙘𝙧𝙖𝙘𝙠𝙚𝙧 𝙤𝙛 𝙖 𝙬𝙞𝙣! ⚡️ ⚡️#TeamIndia beat South Africa by 7⃣ wickets in the second #SAvIND Test to register their first Test win at Newlands, Cape Town. 👏 👏
Scorecard ▶️ https://t.co/PVJRWPfGBE pic.twitter.com/vSMQadKxu8
— BCCI (@BCCI) January 4, 2024
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा आणि मुकेश कुमार.
दक्षिण आफ्रिका प्लेईंग इलेव्हन | डीन एल्गर (कॅप्टन), एडन मारक्रम, टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकटेकीपर), मार्को जान्सेन, केशव महाराज, कगिसो रबाडा, नांद्रे बर्गर आणि लुंगी एनगिडी.