SA vs IND 2nd Test | दक्षिण आफ्रिका टीम इंडियासमोर फ्लॉप, कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंतची निच्चांकी धावसंख्या

| Updated on: Jan 03, 2024 | 4:18 PM

South Africa vs India 2nd Test | पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा डाव आणि 32 धावांनी धुव्वा उडवणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या नावावर दुसऱ्या कसोटीत नकोशा विक्रम झाला आहे. दक्षिण आफ्रिकेने लाजीरवाणी कामगिरी केली आहे.

SA vs IND 2nd Test | दक्षिण आफ्रिका टीम इंडियासमोर फ्लॉप, कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंतची निच्चांकी धावसंख्या
Follow us on

केपटाऊन | टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर दक्षिण आफ्रिकेचा दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात खेळ खल्लास झाला आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर दक्षिण आफ्रिकेचा 55 धावांवर बाजार उठला आहे. मोहम्मद सिराज याने टाकलेल्या धारदार बॉलिंगच्या जोरावर टीम इंडियाला जोरदार मुसंडी मारता आली. तसेच मुकेश कुमार आणि जसप्रीत बुमराह या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेचं पॅकअप केलं. अशाप्रकारे दक्षिण आफ्रिकेची कसोटी क्रिकेटमधील टीम इंडिया विरुद्धची हा सर्वात निच्चांकी धावसंख्या ठरली.

त्याआधी टीम इंडियाने 9 वर्षांआधी 2015 साली दक्षिण आफ्रिकेला 79 धावांवर ऑलआऊट केलं होतं. टीम इंडियाने 25 नोव्हेंबर 2015 रोजी दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 33.1 ओव्हरमध्ये 79 धावांवर गुंडाळलं होतं. हा सामना विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये खेळवण्यात आला होता. तेव्हा टीम इंडियाकडून आर अश्विन याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या होत्या. तर रवींद्र जडेजाने 4 विकेट्स घेत चांगली साथ दिली होती. तर अमित मिश्राच्या खात्यात 1 विकेट गेली. टीम इंडियाने तो सामना 124 धावांनी जिंकला होता.

हे सुद्धा वाचा

दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव

दरम्यान दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेकडून फक्त दोघांनाच 10 पेक्षा अधिक धावा करता आल्या. काइल वेरेन याने सर्वाधिक 15 धावा केल्या. तर डेव्हिड बेडिंगहॅम याने 12 धावांचं योगदान दिलं. मार्को जान्सेन याला भोपळाही फोडता आला नाही. लुंगी एन्गिडी झिरोवर नॉट आऊट परतला. तर या व्यतिरिक्त 7 जणांना दुहेरी आकडा गाठण्याआधीच टीम इंडियाच्या गोलंदाजांनी रोखलं.

टीम इंडियाकडून मोहम्मद सिराज याने 15 धावांच्या मोबदल्यात 6 विकेट्स घेतल्या. सिराजने 9 पैकी 3 ओव्हर मेडन टाकल्या. तर मुकेश कुमार आणि जसप्रीत बुमराह या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.

दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव आटोपला

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा आणि मुकेश कुमार

दक्षिण आफ्रिका प्लेईंग इलेव्हन | डीन एल्गर (कॅप्टन), एडन मारक्रम, टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकटेकीपर), मार्को जान्सेन, केशव महाराज, कगिसो रबाडा, नांद्रे बर्गर आणि लुंगी एनगिडी.