SA vs IND 2nd Test Live Streaming | दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया दुसरा कसोटी सामना केव्हा?

| Updated on: Jan 02, 2024 | 3:17 PM

South Africa vs India 2nd Test Live Streaming | रोहित सेना नववर्षाची विजयाने सुरुवात करुन केप टाऊनमध्ये इतिहास घडवण्यासाठी सज्ज आहे. हा दुसरा कसोटी सामना कधी आणि कुठे होणार? जाणून घ्या.

SA vs IND 2nd Test Live Streaming  | दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया दुसरा कसोटी सामना केव्हा?
Follow us on

केप टाऊन | टीम इंडिया रोहित शर्मा याच्या नेतृत्वात 2024 मधील पहिला सामना हा दक्षिण आफ्रिका विरुद्ध खेळणार आहे. या वर्षातील पहिला सामना हा दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील अखेरचा सामना असणार आहे. दक्षिण आफ्रिका या 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला पहिल्या सामन्यात 1 डाव आणि 32 धावांनी पराभूत करत विजय मिळवला होता. त्यानंतर आता दोन्ही संघ दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज आहेत.

टीम इंडिया या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी हा सामना करा या मरा असा आहे. त्यामुळे टीम इंडिया हा सामना जिंकण्याच्या प्रयत्नाने मैदानात उतरेल. हा दुसरा सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे आणि कधी पाहता येईल, हे सर्वकाही जाणून घेऊयात.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया दुसरा कसोटी सामना केव्हा?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया दुसरा कसोटी सामना बुधवारी 3 जानेवारी रोजी खेळवण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया दुसरा कसोटी सामना कुठे होणार?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया दुसरा कसोटी सामना हा केप टाऊन न्यूलँड्स येथे होणार आहे.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया दुसरा कसोटी सामन्याला किती वाजता सुरुवात होईल?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया दुसरा कसोटी सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 1 वाजता टॉस होईल.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया दुसरा कसोटी सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया दुसरा कसोटी सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहायला मिळेल.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया दुसरा कसोटी सामना मोबाईलवर कुठे पाहता येणार?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया दुसरा कसोटी सामना हा मोबाईलवर डिज्नी प्लस हॉटस्टार एपवर मोफत पाहता येईल. क्रिकेट चाहत्यांना इंग्रजी, हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नडमध्ये कॉमेंट्रीचा आनंद लुटता येईल. मात्र मराठीचा पर्याय नसल्याने मराठी भाषिकांचा हिरमोड होईल.

टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अभिमन्यु ईश्वरन, रवीचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह, आवेश खान आणि प्रसिद्ध कृष्णा.

दक्षिण आफ्रिका टीम | टेम्बा बावुमा (कर्णधार), डेविड बेडिंघम, नांद्रे बर्गर, एडेन मार्करम, वियान मुल्डर, कगिसो रबाडा, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरेन, गेराल्ड कोएट्जी, टोनी डी जोर्जी, डीन एल्गर, मार्को यानसेन, केशव महाराज, लुंगी एनगिडी आणि कीगन पीटरसन.