SA vs IND | टीम इंडियाची केपटाऊनमधील 31 वर्षांची प्रतिक्षा संपली, कॅप्टन रोहितची ऐतिहासिक कामगिरी

| Updated on: Jan 04, 2024 | 7:45 PM

South Afirca vs India 2nd Test | पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला नेस्तानाबूत करत 1 डाव आणि 32 धावांनी विजय मिळवला. मात्र त्यानंतर टीम इंडियाने दुप्पट पटीने मुसंडी मारत रोहित शर्मा याच्या नेतृत्वात दुसऱ्या कसोटीत विजय मिळवला.

SA vs IND | टीम इंडियाची केपटाऊनमधील 31 वर्षांची प्रतिक्षा संपली, कॅप्टन रोहितची ऐतिहासिक कामगिरी
Follow us on

केप टाऊन | टीम इंडियाने दक्षिण आफ्रिके विरुद्धचा दुसरा कसोटी सामना हा 7 विकेट्सने जिंकला. टीम इंडियाने सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच विजयासाठी मिळालेलं 79 धावांचं आव्हान हे 3 विके्टसच्या मोबदल्यात पूर्ण केलं. टीम इंडियाने या विजायसह इतिहास रचला. टीम इंडियाने पहिल्यांदाच केप टाऊमधील न्यूलँड्स ग्राउंडवर विजय मिळवला. टीम इंडियाला हा पहिला विजय मिळवण्यासाठी तब्बल 31 वर्षांची वाट पाहावी लागली. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाने ही कामिगरी करुन दाखवली.

रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताला पहिल्या कसोटीत डाव आणि 32 धावांनी पराभूत व्हावं लागलं. मात्र त्यानंतर टीम इंडियाने केप टाऊन कसोटीतून जोरदार कमबॅक केलं. प्रामुख्याने टीम इंडियाच्या गोलंदाजांनी निर्णायक भूमिका बजावली. टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिकेने गुडघे टेकले. मोहम्मद सिराज याने पहिल्या डावात 6 तर जसप्रीत बुमराह याने 5 विके्टस घेतल्या. त्यामुळे टीम इंडियाला मोठा फायदा झाला. तसेच कॅप्टन म्हणून आतापर्यंत जे मोहम्मद अझहरुद्दीन, राहुल द्रविड, महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली यांना जे जमलं नाही, ते रोहित शर्मा याने करुन दाखवलं.

टीम इंडियाची केप टाऊनमधील सामनेनिहाय कामगिरी

1993 – सामना ड्रा

हे सुद्धा वाचा

1997 – दक्षिण आफ्रिका 282 धावांनी विजयी

2007 – दक्षिण आफ्रिका 5 विकेट्सने विजयी

2011 – सामना अनिर्णित

2018 – दक्षिण आफ्रिकेचा 72 धावांनी विजय

2022 – दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेट्सने विजय

2023 – टीम इंडियाचा 7 विकेट्सने विजय

दुसऱ्यांदा मालिका बरोबरीत सोडवण्यात यश

दरम्यान टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेत यजमानांविरुद्ध कसोटी मालिका बरोबरीत सोडवण्यात दुसऱ्यांदा यश आलं आहे. याआधी टीम इंडियाने महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात 2010-2011 मध्ये पहिल्यांदा मालिका अनिर्णित राखली होती. त्यानंतर आता थेट 2023-2024 मध्ये टीम इंडिया यशस्वी ठरली आहे.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा आणि मुकेश कुमार.

दक्षिण आफ्रिका प्लेईंग इलेव्हन | डीन एल्गर (कॅप्टन), एडन मारक्रम, टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकटेकीपर), मार्को जान्सेन, केशव महाराज, कगिसो रबाडा, नांद्रे बर्गर आणि लुंगी एनगिडी.