पार्ल | दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसरा आणि निर्णायक सामन्याला आज 21 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 4 वाजता टॉस झाला. या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला. कॅप्टन एडन मारक्रम याने बॉलिंगचा निर्णय घेत पुन्हा एकदा टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. ही मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे दोन्ही संघांना मालिका जिंकण्याची संधी आहे. टीम इंडियाने या निर्णायक सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये 2 बदल करण्यात आले आहे.
टीम इंडियाने या तिसऱ्या सामन्यासाठी 2 बदल केले आहेत. ऋतुराज गायकवाड याला दुखापतीमुळे तिसऱ्या सामन्यातून बाहेर पडावं लागलं आहे. त्याच्याजागी रजत पाटीदार याला संधी दिली आहे. रजत पाटीदार याचं आंतरराष्ट्रीय पदार्पण ठरलं आहे. तर कुलदीप यादव याच्या जागी ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर याला संधी दिली गेली आहे. तर दुसऱ्या बाजूला दक्षिण आफ्रिकेने आपल्या त्याच खेळाडूंवर विश्वास दाखवत प्लेईंग ईलेव्हनमध्ये कुठलाही बदल केलेला नाही.
या तिसऱ्या सामन्याचं आयोजन हे पार्लमधील बोलँड पार्कमध्ये करण्यात आलं आहे. या स्टेडियममध्ये गेल्या 5 सामन्याबाबत आपण जाणून घेऊयात. या 5 सामन्यांमध्ये पहिले बॅटिंग करणारी टीमचा 3 वेळा विजय झाला आहे. तर चेसिंग करताना 2 वेळा संघांचा विजय झाला आहे.
टीम इंडियाचे 11 शिलेदार
A look at #TeamIndia‘s Playing XI for the third and final ODI 👌👌
Rajat Patidar is set to make his ODI debut 👏👏
Follow the Match ▶️ https://t.co/nSIIL6gzER#TeamIndia | #SAvIND pic.twitter.com/3qHkp6M32u
— BCCI (@BCCI) December 21, 2023
केएल राहुलने आतापर्यंत 11 एकदिवसीय सामन्यांमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केलं आहे. केएलने टीम इंडियाला या 11 पैकी 7 सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. तर 4 सामन्यांमध्ये पराभव झाला आहे.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), संजू सॅमसन, साई सुदर्शन, रजत पाटीदार, तिलक वर्मा, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान आणि मुकेश कुमार.
दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | एडन मारक्रम (कॅप्टन), टोनी डी झोर्झी, रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, केशव महाराज, नांद्रे बर्गर, लिझाद विल्यम्स आणि ब्यूरन हेंड्रिक्स.