पार्ल | केएल राहुल याच्या नेतृत्वात टीम इंडिया दक्षिण आफ्रिके विरुद्ध 20 डिसेंबर रोजी तिसरा आणि अंतिम एकिदिवसीय सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. उभयसंघातील 3 सामन्यांची मालिका ही 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे दोन्ही संघांना मालिका विजयाची संधी आहे. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवून धमाकेदार सुरुवात केली. मात्र दक्षिण आफ्रिकेने करो या मरो अशा दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा 8 विकेट्सने धुव्वा उडवत मालिकेत बरोबरी केली. त्यामुळे आता तिसरा सामना हा निश्चितच चुरशीचा आणि चढाओढीचा होणार आहे.
टीम इंडियाच्या गोलंदाजांनी पहिल्या सामन्यात अफलातून कामगिर केली होती. दक्षिण आफ्रिकेला स्वसतात रोखल्यानंतर फलंदाजांनीही चांगली कामगिरी करत विजय मिळवून दिला. मात्र दुसऱ्या सामन्यात टीम इंडियानच्या फलंदाजानंतर गोलंदाजही अपयशी ठरले. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी आणि त्यानंतर फलंदाजांनी टीम इंडियावर घट्ट पकड मिळवत विजय मिळवला. त्यामुळे सीरिज डिसायडर सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये बदल होणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे.
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ओपनर टोनी डी जोर्जी याने नाबाज शतक ठोकत दक्षिण आफ्रिकेच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. तर दुसऱ्या बाजूने टीम इंडियाचे फलंदाज अपयशी ठरले. तिलक वर्मा आणि ऋतुराज गायकवाड या दोघांना आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता येत नाहीये. तसेच गेल्या 2 सामन्यात सलामी जोडी चांगली सुरुवात करुन देण्यात अपयशी ठरलीय. त्यामुळे टीम इंडियाच्या बॅटिंगचा तोल ढासळलाय. त्यामुळे तिलक वर्मा याच्या जागी टीममध्ये रजत पाटीदार याला संधी मिळू शकते.
तर टीम इंडियाच्या गोलंदाजांना पहिल्या सामन्याप्रमाणे दुसऱ्या सामन्यात लय कायम ठेवता आली नाही. मात्र त्यातल्या त्यात अर्शदीप सिंह याने थोडाफार प्रयत्न केला. तर मुकेश कुमार आणि इतर गोलंदाज अपयशी ठरले. त्यामुळे टीममध्ये अनुभवी लेग स्पिनर युझवेंद्र चहल याला संधी दिली जाऊ शकते. चहलने नुकत्याच पार पडलेल्या विजयी हजारे ट्रॉफीत हरयाणासाठी उल्लेखनीय कामगिरी केली.
एकदिवसीय मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका टीम | एडन मारक्रम (कॅप्टन), बार्टमॅन, नांद्रे बर्गर, टोनी डी जॉर्जी, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, मिहाली पोंगवाना, डेविड मिलर, वियान मुल्डर, एंडिले फेहलुकवायो, तबरेज शम्सी, रासी वेन डेर डुसे, कायल वेरेयेन आणि लिजाड विलियम्स.
दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया | केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान , अर्शदीप सिंग आणि आकाश दीप.