पार्ल | संजू सॅमसन याने केलेलं शतक, तिलक वर्मा याचं अर्धशतक आणि रिकू सिंह याने दिलेला फिनिशिंग टचच्या जोरावर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 297 धावांचं आव्हान दिलं. टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 296 धावा केल्या. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिकेला सामन्यासह मालिका जिंकण्यासाठी 297 धावा कराव्या लागणार आहेत. आता टीम इंडियाचे गोलंदाज या धावांचा बचाव करण्यात यशस्वी ठरतात का, याकडे भारतीय चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
टीम इंडियाकडून संजू सॅमसन याने सर्वाधिक 108 धावांची खेळी केली. संजूचं हे पहिलंवहिलं आंतरराष्ट्रीय शतक ठरलं. तसेच तिलक वर्मा याने 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. तिलकचं हे वनडेतील पहिलं अर्धशतक ठरलं. तिलकने 52 धावांचं योगदान दिलं. तर रिंकू सिंह याने नेहमीप्रमाणे फिनीशरची भूमिका चोखपणे पार पाडली. रिंकूने 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 38 धावा जोडल्या. तर डेब्यूटंट रजत पाटीदार याने 22, साई सुदर्शन 10, कॅप्टन केएल राहुल याने 21 आणि वॉशिंग्टन सुंदर याने 14 धावा केल्या. अक्षर पटेल 1 रनवर आऊट झाला. तर अर्शदीप सिंह 7 आणि आवेश खान 1 धावेवर नाबाद परतले.
दक्षिण आफ्रिकेकडून ब्यूरन हेंड्रिक्स याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. नांद्रे बर्गर याने 2 फलंदाजांना माघारी पाठवलं. तर लिझाद विल्यम्स , विआन मुल्डर आणि केशव महाराज या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
दरम्यान टीम इंडियाने पहिल्या 30 ओव्हरच्या तुलनेत अखेरच्या 20 षटकांमध्ये दुप्पट धावा केल्या. तर शेवटच्या 5 ओव्हरमध्ये टॉप गिअरमध्ये बॅटिंग केली. टीम इंडियाने पहिल्या 30 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 132 धावा केल्या. तर शेवटच्या 20 षटकांमध्ये 164 धावा जोडल्या. तर अखेरच्या 5 ओव्हरमध्ये टीम इंडियाला 51 धावा जोडण्यात यश आलं, मात्र टीम इंडियाला त्यासाठी 4 विकेट्स गमवाव्या लागल्या.
संजू सॅमसन चमकला
Innings Break!
Sanju Samson’s knock of 108 runs powers #TeamIndia to a total of 296/8.
Scorecard – https://t.co/u5YB5B03eL #SAvIND pic.twitter.com/YG5Xt7HVlF
— BCCI (@BCCI) December 21, 2023
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), संजू सॅमसन, साई सुदर्शन, रजत पाटीदार, तिलक वर्मा, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान आणि मुकेश कुमार.
दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | एडन मारक्रम (कॅप्टन), टोनी डी झोर्झी, रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, केशव महाराज, नांद्रे बर्गर, लिझाद विल्यम्स आणि ब्यूरन हेंड्रिक्स.