SA vs IND : टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडचा धमाका, दक्षिण आफ्रिकेला लोळवत 6 वर्षांआधीच्या पराभवाची परतफेड

| Updated on: Nov 14, 2024 | 12:50 PM

South Africa vs India 3rd T20i Centurion : टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला तिसर्‍या टी 20i सामन्यात पराभूत करत सेंच्युरियन येथे 6 वर्षांपूर्वीचा हिशोब क्लिअर केला.

SA vs IND : टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडचा धमाका, दक्षिण आफ्रिकेला लोळवत 6 वर्षांआधीच्या पराभवाची परतफेड
hardik suryakumar yadav sanju samson team india
Image Credit source: Bcci x Account
Follow us on

तिलक वर्मा याच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेवर सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिकेवर 11 धावांनी विजय मिळवला. भारताने या विजयासह 4 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली. तिलक वर्मा याच्या 107 धावांच्या मदतीने भारताने 6 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 219 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने जोरदार प्रतिकार करत सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत खेचला मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. दक्षिण आफ्रिकेला 7 विकेट्स गमावून 208 धावाच करता आल्या. भारताने यासह सेंच्युरियन येथील स्पोर्ट्सपार्क ग्राउंडमध्ये विजय मिळवला आणि दक्षिण आफ्रिकेचा हिशोब क्लिअर केला.

6 वर्षांपूर्वीच्या पराभवाची परतफेड

उभयसंघातील सेंच्युरियन येथील हा दुसरा टी 20I सामना होता. याआधी दोन्ही संघात 21 फेब्रुवारी 2018 रोजी टी 20I सामाना खेळवण्यात आला होता. तेव्हा भारताने विजयासाठी दिलेलं 189 धावांचं आव्हान दक्षिण आफ्रिकेने 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं होतं. तेव्हा विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताला पराभूत व्हावं लागलं होतं. तेव्हापासून टीम इंडिया पराभवाची परतफेड करण्याच्या प्रतिक्षेत होती. भारताची प्रतिक्षा अखेर साडे सहा वर्षांनंतर संपली.

6 वर्षांपूर्वी

6 वर्षांनंतर

टीम इंडियाचा हा सेंच्युरियनमधील पहिला विजय ठरला. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात भारताने ही कामगिरी केली. सूर्याने या विजायसह विराटच्या पराभवाचा वचपा घेतला आणि दक्षिण आफ्रिकेचा हिशोब बरोबर केला.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई आणि वरुण चक्रवर्ती.

दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन: एडन मार्करम (कॅप्टन), रायन रिकेल्टन, रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, मार्को यान्सेन, अँडिले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज आणि लुथो सिपामला.