जोहान्सबर्ग | कॅप्टन सूर्यकुमार यादव याचं शतक आणि यशस्वी जयस्वाल याच्या अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या टी 20 सामन्यात विजयासाठी 202 धावांचं आव्हान दिलं आहे. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 201 धावा केल्या. टीम इंडियाकडून सूर्याने सर्वाधिक 100 धावा केल्या. तर यशस्वी जयस्वाल याने 60 धावांची खेळी केली. या दोघांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाने 200 पार मजल मारली. आता टीम इंडियाचे गोलंदाज कशाप्रकारे 202 धावांचा बचाव करतात का? याकडे लक्ष असणार आहे.
यशस्वी जयस्वाल आणि शुबमन गिल सलामी जोडी मैदानात आली. या दोघांनी 29 धावांची सलामी भागीदारी केली. शुबमन गिल 12 धावांवर रीव्हीव्यू न घेतल्याने एलबीडब्ल्यू आऊट झाला. गिलनंतर दुसऱ्याच बॉलवर तिलक वर्मा झिरोवर आऊट झाला. त्यानंतर कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जयस्वाल या दोघांनी फटकेबाजी करायला सुरुवात केली. या दरम्यान यशस्वीने अर्धशतक झळकावलं. यशस्वीला अर्धशतकानंतर चांगला खेळत होता. मात्र तबरेज शम्सी याने ही जोडी फोडली.
तिसऱ्या विकेटसाठी 112 धावांची भागीदारी केली. यशस्वीने 41 बॉलमध्ये 3 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 60 धावा केल्या.
यशस्वीनंतर रिंकू सिंह हा 14 धावांवर आऊट झाला. त्यानंतर सूर्याने शतक पूर्ण केलं. शतकानंतर सूर्या दुसऱ्या बॉलवर आऊट झाला. सूर्याने 56 बॉलमध्ये 100 धावा केल्या. सूर्या आऊट झाल्यानंतर रवींद्र जडेजा आणि जितेश शर्मा प्रत्येकी 4 धावा करुन माघारी परतले. तर अर्शदीप सिंह 0 आणि मोहम्मद सिराज नाबाद 2 धावा करुन माघारी परतले. दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराज आणि लिझाद विल्यम्स या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर नांद्रे बर्गर आणि तबरेझ शम्सी या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.
सूर्यकुमार यादवचं कडक शतक
Innings Break!
Captain @surya_14kumar ’s 100 (56) and @ybj_19’s 60 (41) steers #TeamIndia to 201/7 🙌
Over to our Bowlers now 👍#SAvIND pic.twitter.com/OpTQ1kzjWJ
— BCCI (@BCCI) December 14, 2023
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह आणि मुकेश कुमार.
दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | एडन मारक्रम (कॅप्टन), रीझा हेंड्रिक्स, मॅथ्यू ब्रेट्झके, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, अँडिले फेहलुकवायो, केशव महाराज, लिझाद विल्यम्स, तबरेझ शम्सी आणि नांद्रे बर्गर.