SA vs IND 4th T20i : चौथ्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार? जाणून घ्या

| Updated on: Nov 14, 2024 | 5:03 PM

South Africa vs India 4th T20i Live Streaming : दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील टी 20i सामन्यांची वेळ बदलत असल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये संभ्रम आहे. जाणून घ्या चौथ्या सामन्याला किती वाजता सुरुवात होईल?

SA vs IND 4th T20i : चौथ्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार? जाणून घ्या
sanju samson sa vs ind 2nd t20i
Image Credit source: ProteasMenCSA X Account
Follow us on

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 4 सामन्यांची टी 20i मालिका खेळवण्यात येत आहे. टीम इंडिया या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाने बुधवारी 13 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेवर तिसर्‍या सामन्यात 11 धावांनी मात करत दुसरा विजय मिळवला आणि आघाडी घेतली. त्यानंतर आता दोन्ही संघ चौथ्या आणि अंतिम सामन्यासाठी सज्ज आहेत. या मालिकेतील सामन्यांना एकाच वेळेस सुरुवात झाली नाही. त्यामुळे आता हा चौथा सामना किती वाजता सुरु होणार? हे आपण जाणून घेऊयात.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया चौथा टी 20i सामना केव्हा?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया चौथा टी 20i सामना शुक्रवारी 15 नोव्हेंबरला होणार आहे.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया चौथा टी 20i सामना कुठे?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया चौथा टी 20i सामना वांडरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग येथे होणार आहे.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया चौथा टी 20i सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया चौथा टी 20i सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 8 वाजता टॉस होईल.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया चौथा टी 20i सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येईल?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया चौथा टी 20i सामना टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर टीव्हीवर लाईव्ह मॅच जिओ सिनेमा एपवर पाहता येईल.

दक्षिण आफ्रिके विरूद्धच्या टी 20i मालिकेसाठी टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमनदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार वैशाख, अवेश खान आणि यश दयाल.

T20I सीरिजसाठी दक्षिण आफ्रिका टीम : एडन मार्करम (कॅप्टन), ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, डोनोव्हन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, पॅट्रिक क्रुगर, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मिहलाली मपोंगवाना, न्काबा पीटर, रायन सिमलेटन, रायन रिकेल लुथो सिपमला (तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यासाठी) आणि ट्रिस्टन स्टब्स.